झी टॉकीज तर्फे दिमाखात रंगला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? पुरस्कार सोहळा

कोण होणार महाराष्ट्राचा फेव्हरेट ही टॅगलाईन गेल्या महिन्याभरापासून मनोरंजन विश्वासह सोशल मीडियाच्या जगात खूपच चर्चेत होती . सिनेमा, अभिनेता, अभिनेत्री, गायक, गायिका, संगीतकार, दिग्दर्शक, खलनायिका, खलनायक यासह १२  विभागातील महाराष्ट्राचा फेव्हरेट कलाकार निवडला तो प्रेक्षकांच्या पसंतीने .  उत्सुकतेचा कळस गाठलेला हा सोहळा सेलिब्रिटींच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखात पार पडला  आकर्षक ड्रेसिंग, स्टायलिश फॅशन अशा लुकमध्ये झी टॉकीजच्या " महाराष्ट्राचा फेव्हरेट  कोण? "या पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींनी लक्ष वेधून घेतले. " महाराष्ट्राचा फेव्हरेट  कोण? " हा सोहळा १२ फेब्रुवारी ला दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता झी टॉकीज वाहिनीवर प्रदर्शित केला जाणार आहे .

१५ डिसेंबरला, महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कारांची नामांकने मोठ्या दणक्यात जाहीर करण्यात आली होती . त्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीसाठी वोटिंग लाईन्स सुरू करण्यात आली होती .या स्पर्धेला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यांच्या आवडत्या कलाकाराला मत देण्यासाठी झी टॉकीज ने जाहीर केलेल्या विविध माध्यमांवर प्रेक्षकांनी आपली मतं नोंदवली होती .
झी टॉकीज तर्फे दरवर्षी वर्षभरात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांशी निगडित विविध विभागातील कलाकारांसाठी प्रेक्षकांकडून त्यांच्या पसंतीचा कलाकार कोण हे जाणून घेत त्याला पुरस्कार दिला जातो . महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? या नावाने  दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराशी चर्चा केवळ झी टॉकीजच्या प्रेक्षकांमध्येच नसते तर मराठी सिनेसृष्टीतील सर्व कलाकारांनाही प्रेक्षक पसंतीचा कौल आपल्याला मिळावा अशी इच्छा असते . महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ?या व्यासपीठावर ज्या कलाकाराला असा प्रेक्षक पसंतीचा कौल मिळतो त्याच्यासाठी आनंदाला सीमा नसते. अशाच काहीशा भावना नुकत्याच रंगलेल्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात विजेत्या कलाकारांच्या चेहऱ्यावर उमटल्या होत्या.  नेत्रदीपक विद्युत रोषणाई , विविध कलाकारांचे थिरकायला लावणारे डान्स परफॉर्मन्स आणि विनोदी स्कीटची हास्याचे फवारे उडवणारी फोडणी अशा रंगतदार वातावरणात महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? हा सोहळा झी टॉकीज ने अक्षरशः उंचीवर नेऊन ठेवला .

महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्काराच्या स्पर्धेत गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या सिनेमातील कलाकार सहभागी झाले होते .  या पुरस्कार सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील मोठमोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती . यामध्ये अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री अमृता खानविलकर, यावर्षी मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे ,मकरंद अनासपुरे , ललित प्रभाकर, प्रथमेश परब ,अमेय वाघ, शरद केळकर ,भाऊ कदम, आदिनाथ कोठारे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, वैदही परशुरामी, दिग्दर्शक नागराज मंजुळे ,दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि त्याच बरोबर ज्याच्या चित्रपटाने  सध्या सर्वांना वेड लावलंय असा अभिनेता रितेश देशमुख अशा एकाहून एक सेलिब्रिटीच्या उत्साही सहभागाने झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या सोहळ्याला चांगलीच रंगत आली . लवकरच हा सोहळा झी टॉकीजच्या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे . महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ?या पुरस्कारांवर प्रेक्षकांनी  आपली पसंतीची मोहर कुठल्या कलाकाराच्या नावावर कोरली हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे  हा सोहळा १२ फेब्रुवारी ला दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता झी टॉकीज वाहिनीवर प्रदर्शित केला जाणार आहे .

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight