‘चिरायू’ २०२३ जल्लोषात साजरा

 चिरायू’ २०२३ जल्लोषात साजरा

मराठी नववर्षदिनाच्या स्वागतासाठीत्याच्या पूर्वसंध्येला साजरा होणारा मराठी कलाविश्वाचा 'चिरायू' या ही वर्षी हर्षोल्हासात साजरा झाला. अवघं मराठी कलाविश्व यानिमित्ताने एकवटलं होतं. शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या चिरायूचे वैशिष्ट्य म्हणजे नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या कलाकर्मींची दखल चिरायूच्या मंचावर घेतली जाते. उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात हा सोहळा दिमाखात रंगला.

पारंपारिक गोष्टींचा साज लेवून आरोग्याची व अक्षरांच्या गुढीची संकल्पना यंदाच्या 'चिरायूची खासियत. मराठी कविता तसेच संदेश याच्या माध्यामातून सृजनात्मक अनुभवासोबत तृतीयपंथीयां च्या हस्ते विशेष गुढीची निर्मिती आणि गुढी उभारत नव्या विचारांचा पायंडा 'चिरायूने यंदा पाडला. यंदा विनोद राठोड,पुंडलिक सानपविलास हुमणे या प्रकाश योजनाकारांना  सन्मानित  करण्यात आले. तसेच समाजसेवेसाठी अर्चना नेवरेकर मंगेश चिवटे (शिवसेना वैद्यकीय कक्ष) यांचा सत्कार करण्यात आला. अक्षय बर्दापूरकरकरण नाईक विलास कोठारी,अर्जुन मुद्दा साजन पाटील आदि मान्यवरांचे सहकार्य यासाठी लाभले.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight