गोदरेज आणि बॉइसचा भारतीय रेल्वे आणि मेट्रोसाठी स्वयंचलित वॉशिंग सिस्टम विकसित करण्यासाठी जेसीडब्ल्यू (JCW) जपान सोबत सामंजस्य करार
गोदरेज आणि बॉइसचा भारतीय रेल्वे आणि मेट्रोसाठी स्वयंचलित वॉशिंग सिस्टम विकसित करण्यासाठी जेसीडब्ल्यू (JCW) जपान सोबत सामंजस्य करार
~ स्वयंचलित वॉशिंग सिस्टममध्ये पाण्याच्या पुनर्वापराचे प्रमाण जास्त असेल आणि ऊर्जेचा वापर कमी होईल, ज्यामुळे हरित भारत निर्माणाला हातभार लागेल.
~ ही भागीदारी पुढील काही वर्षांमध्ये गोदरेज टूलिंगला रु. २०० कोटींपेक्षा जास्त बाजार संधी देईल.
मुंबई, २७ मार्च २०२३: गोदरेज समूहाची एक प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉइसने जाहीर केले की, त्यांच्या गोदरेज टूलिंग या व्यवसायाने भारतीय रेल्वे आणि मेट्रोसाठी स्वयंचलित आणि टिकाऊ अशी वॉशिंग सिस्टम विकसित करण्यासाठी जपानची एक वाहन साफसफाई मशीन उत्पादन करणारी प्रसिद्ध कंपनी जेसीडब्ल्यू (JCW) जपान सोबत भागीदारी केली आहे. गोदरेज टूलिंगच्या भारतातील मजबूत अस्तित्वासह जेसीडब्ल्यू (JCW) जपानच्या जागतिक कौशल्याची जोड देऊन ही आघाडी भारताला अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञान सादर करण्याचे आणि विविध स्वयंचलित वॉशिंग सिस्टमच्या स्वदेशीकरणात योगदान देण्याचे वचन देते.
पुढील तीन वर्षांत सुमारे ५० नवीन मेट्रो मेंटेनन्स डेपो अपेक्षित असल्याने भारतीय बाजारपेठेत वॉशिंग सिस्टमची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. स्वयंचलित वॉशिंग सिस्टमच्या क्षेत्रात रेल्वे आणि मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून पुढील पाच वर्षांमध्ये सुमारे रु २०० कोटींची संधी मिळण्याचा अंदाज आहे. ही नवीनतम वॉशिंग सिस्टम एक असे शाश्वत साफसफाईचे पर्याय प्रदान करेल जे संसाधने आणि वेळेचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करेल. सुरुवातीला, गोदरेज टूलिंग २०-३०% च्या स्वदेशीकरणासह सुरू होऊन पुढील पाच वर्षात स्थानिक क्षमता ८०% पर्यंत वाढवण्याचे व्यवसायाचे उद्दिष्ट आहे.
यावेळी बोलताना गोदरेज टूलिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख पंकज अभ्यंकर म्हणाले, “जेसीडब्ल्यू (JCW) जपान सोबतची ही भागीदारी रेल्वे आणि मेट्रो कोचची देखभाल आणि सर्व्हिसिंगचा वेग आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा आहे आणि ज्यामुळे रेल्वे आणि मेट्रो सुरक्षा अजून वाढेल. जेव्हा स्वयंचलित रेल्वे साफसफाई केंद्रातून रेल्वे जाईल तेव्हा ती भिजवणे, पाणी टाकणे, साबणाचा फेस तयार करणे, ते धुणे आणि नंतर कोरडे करणे अशा आधीच ठरवून दिलेल्या कार्यांच्या एका मालिकेतून ती जाते आणि ही पूर्वनिश्चित कार्यांची मालिका कोचच्या प्रकारानुसार बदलते. रेल्वेच्या लांबीनुसार संपूर्ण साफसफाईच्या प्रक्रियेस फक्त पाच ते दहा मिनिटे लागतात. स्वयंचलित वॉशिंग सिस्टममध्ये पाण्याच्या पुनर्वापराची टक्केवारी जास्त आहे आणि उर्जेचा वापर कमी आहे त्यामुळे शाश्वततेला हातभार लागेल.”
Comments
Post a Comment