द माईंडफूल हार्ट टॉक शो' चे दुसरे पर्व भेटीला
'द माईंडफूल हार्ट टॉक शो' चे दुसरे पर्व भेटीला
काही माणसं चौकटीत राहून काम करतात. तर काही चौकटीबाहेरचा विचार करतात. चौकटीबाहेरचा विचार करणारी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून नवे विचार, कल्पना रुजवत असतात. या नव्या कल्पना, विचार जाणून घेत इतरांना प्रेरणा मिळावी या हेतूने राजकारण, समाजकारण, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलतं करणारा 'द माईंडफूल हार्ट टॉक शो' युट्यूब चॅनेलवर चांगलाच लोकप्रिय झाला. २०२१ मध्ये सुरु झालेल्या या शोमधून अनेक मान्यवरांच्या दिलखुलास मुलाखती घेतल्या गेल्या. 'आरती सूर्यवंशी' या युट्यूब चॅनेलद्वारे प्रदर्शित केल्या जाणाऱ्या या 'टॉक शो' च्या पहिल्या पर्वाला २५ हजारहून अधिक दर्शक लाभले. या प्रतिसादानानंतर आता ‘शो' चे दुसरे पर्व भेटीला येणार आहे.
एका छोटेखानी कार्यक्रमात 'द माईंडफूल हार्ट टॉक शो' च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की उपस्थित होते. अशोक पत्की यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.विशेष म्हणजे या टॉक शो' चे थीम सॉंग स्वतः अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केले आहे. वेगळया जाणीवेने सुरु केलेल्या 'द माईंडफूल हार्ट टॉक शो' ला अनुसरून असलेले हे गीत संगीतबद्ध करण्याचा आनंद तर आहेच पण एका चांगल्या कार्यक्रमाचा भाग होता आल्याचं समाधान संगीतकार अशॊक पत्की व्यक्त करतात. डॉ. आरती सूर्यवंशी यांनी लिहिलेले हे गाणं गायिका राही सूर्यवंशी यांनी गायलं आहे. परीक्षित कुलकर्णी यांनी साउंड मिक्सिंगची जबाबदारी सांभाळली आहे. या कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, दिग्दर्शक विश्वास जोशी, अभिनेता कशिश सलुजा, रवींद्र पाटील (साईओ झोपडपट्टी सुधारक मंडळ), विलास तोकले (पीटीआयचे पश्चिम क्षेत्र प्रमुख), दराडे (आरटीओ निवृत्त ), डॉ.प्रशांत पाटील (अध्यक्ष, आयएमए कल्याण), तुलसीदास मांजरेकर (ट्रेकर) , अर्णव पटवर्धन (पक्षी निरीक्षक) आदि मान्यवर उपस्थित होते.
या ‘टॉक शो’ बद्दल बोलताना 'आरती सूर्यवंशी' सांगतात, ह्या कार्यक्रमाची थीम ही ‘पॅशन, प्रोफेशन आणि पर्पज’ असणार आहे. आपल्याभोवती अशी अनेक व्यक्तिमत्वे असतील ज्यांचे पॅशन हेच प्रोफेशन आणि जीवनाचं पर्पज किंवा ध्येय असू शकतं किंवा अशाही व्यक्ती असू शकतात ज्यांचं पॅशन आणि प्रोफेशन वेगवेगळं असू शकतं. प्रत्येक स्टोरी ही महत्त्वाची आहे. माइंडफुलनेस आणि भावनिक बुद्धिमत्ता एकमेकांच्या हातात हात घालून जातात. अशा व्यक्ती यशस्वी असतात. सरासरीपेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती घेतल्या तर त्या त्यांच्या आयुष्यात यशस्वी दिसायला हव्यात पण तस दिसत नाही येथेच माइंडफूलनेस आणि भावनिक बुद्धिमत्तेचा रोल दिसून येतो. त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत अशा व्यक्तींच्या गोष्टी पोहोचणं हे खूप आवश्यक आहे. आम्हाला खात्री आहे कि, ह्यावेळच्या 'माइंडफूल हार्ट 'टॉक शो' च्या दुसऱ्या पर्वाला देखील असाच भरभरून प्रतिसाद मिळेल. आम्ही सगळ्या दर्शकांना मनोरंजक पद्धतीने गुंतवून ठेवण्यात यशस्वी होऊ असा विश्वास त्या व्यक्त करतात.
दुसऱ्या पर्वामध्ये खालील मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
विश्वास ठाकूर (चेअरमन विश्वास को-ऑप बँक, विश्वास रेडिओ, सूर विश्वास, आत्म विश्वास इत्यादी), विनायक रानडे (संस्थापक ग्रंथ तुमच्या दारी), शुभांगी पंडित पाठक (विख्यात ऍक्टर अँड प्लेअर,) रुचिता ठाकूर (तरुण उद्योजिका आणि संचालिका विश्वास रेडिओ), सायली तळवलकर (प्रथितयश हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आणि संस्थापिका-इंडी रूट्), अशोक पत्कीकाका (सुप्रसिद्ध संगीतकार.), आनंदजी, मिलिंदजी आणि समीरजी (ज्यांचा सगळ्यात जास्त हिंदी चित्रपटगीते दिल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे.), सायली कांबळे, (इंडियन आयडॉल उपविजेती), डॉ. वरद सबनीस (आर्किओलॉजिस्ट, पुरातत्त्व तज्ञ, गोवा), संकेत नाईक (प्राथमिक शिक्षक जे तिलारी प्रकल्पात जमिनी गेलेल्या कुटुंबातील मुलांच्या शाळेशी जोडले गेले आहेत.), लेखक आणि दिग्दर्शक विश्वास जोशी ज्यांचा ‘फुलराणी’ चित्रपट २२ मार्चला प्रदर्शित होतो आहे.
Comments
Post a Comment