प्राजक्ता पौडवाल पाडगांवकरने जिंकले मिसेस इंडिया आयकॉनिक दिवा २०२३ केजेएम ड्रीम्ज एंटरटेनमेंटचे विजेतेपद
प्राजक्ता पौडवाल पाडगांवकरने जिंकले मिसेस इंडिया आयकॉनिक दिवा २०२३ केजेएम ड्रीम्ज एंटरटेनमेंटचे विजेतेपद
मुंबई : ठाणे शहरातील रहिवासी असलेल्या प्राजक्ता पौडवाल पाडगांवकर हिने मिसेस इंडिया आयकॉनिक दिवा २०२३ चे विजेतेपद पटकावले. केजेएम ड्रीम्ज एंटरटेनमेंटच्या मिस आणि मिसेस इंडिया आयकॉनिक दिवा २०२३ चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. केजेएम ड्रीम्ज एंटरटेनमेंटच्या संस्थापक आणि ऑर्गनायजर कविता किशोर आणि रेयांश शर्मा यांनी तिला मुकुट घातला. या संध्याकाळी प्राजक्ताने चमकदार चांदीचा गाऊन परिधान करून सर्वाना मोहित केले. प्राजक्ताने इतर १९ स्पर्धकांना मागे टाकून केजेएम ड्रीम्ज एंटरटेनमेंट स्पर्धेची विजेती बनली. या कार्यक्रमाला श्रीजीता डे, सौम्या सारस्वत आणि इतर टीव्ही व्यक्तिरेखा उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment