‘आयटीबी बर्लिन’ महोत्सवात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

 आयटीबी बर्लिन’ महोत्सवात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन 

दरवर्षीप्रमाणे यंदाही जर्मनीत आयटीबी बर्लिन २०२३’ तर्फे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पर्यटन उद्योगाला जागतिक पातळीवर चालना देण्यासाठी प्रतिष्ठित आयटीबी बर्लिन व्यापार मेळाव्यात राज्याच्या पर्यटन विभागाने सहभाग घेतला होता. यावर्षी आयटीबी बर्लिन’ व्यापार मेळाव्यामध्ये जवळपास १६१ देश तसेच १०,००० पेक्षा जास्त प्रदर्शकांनी सहभाग नोंदवला. त्याठिकाणी वैभवशाली संस्कृतीसमृद्ध इतिहासनिळे समुद्रकिनारे असलेल्या महाराष्ट्राची वैशिष्ट्ये सर्वांसमोर मांडण्यात आली.

यावर्षी आयटीबी बर्लिन एमटीडीसी’ चा ‘महाराष्ट्र पर्यटन स्टॉल संपूर्ण आयटीबीचा केंद्रबिंदू राहिला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनुभव घेता यावा यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.  यात महाराष्ट्रातील पारंपारिक नृत्यप्रकार, लावणी या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. अभिनेत्री लावणीसम्राज्ञी करिश्मा वाबळे हिने आपल्या धमाल लावणी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे आयोजन स्टारक्राफ्ट एंटरटेनमेंट प्रा.लि. चे संचालक श्री संतोष मिजगर यांनी केले होते. या कार्यक्रमात बॉलीवूड पार्कवीणा वर्ल्डस्वदेश ट्रॅव्हल्सकॅप्टन नीलेश गायकवाडडेक्कन ओडिसीगोवर्धन इको व्हिलेज हे सह-प्रदर्शक म्हणून सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight