'स्वामी माझी आई' म्युझिक व्हिडीओ प्रकाशित

 'स्वामी माझी आईम्युझिक व्हिडीओ प्रकाशित

भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या  आणि 'भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे’, असे अभिवचन भक्तांना देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन नुकताच  संपन्न झाला. स्वामींचा आभास सदैव सोबत असतो, परंतु सहवास नेहमी असेल की नाही सांगता येत नाही म्हणून तर आई आणि आईची मायाआईची साथसोबत त्यांनी प्रत्येकासोबत जोडली. स्वामींच्या  प्रकट दिनाचे औचित्य साधून 'स्वामीरुपी 'आईची  महती सांगणाऱ्या  'स्वामी माझी आई' या  मराठी म्युझिक व्हिडीओची निर्मिती  ‘आनंदी वास्तूने केली आहे.  आई केवळ पोटातून जन्म देणारी किंवा रक्ताचे नाते नसून आई ही ईश्वराचा अंश असते. आपला सांभाळ करणारीमायेने खाऊ घालणारीआयुष्याला योग्य वळण देणारी,  संस्कार घडवणारी व्यक्ती म्हणजेच आई… 'स्वामी माझी आई'   या मराठी म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून अशाच स्वामीरुपी आई’ ह्या भावनेचं दर्शन घडणार आहे. 

'स्वामी माझी आई'  या  म्युझिक व्हिडीओची निर्मिती आनंदी वास्तू  यांनी केली  असून   ओंकार हनुमंत माने यांचे लेखन -दिग्दर्शन आहे. सौ अश्विनी आनंद पिंपळकर,  आनंद पिंपळकर (वास्तुतज्ञज्योतिर्विद) हे निर्माते आहेत.  आनंद पिंपळकरझी मराठी वरील ‘देवमाणूस’  मालिकेतील अस्मिता देशमुखकलर्स वरील योग योगेश्वर जय शंकर” मालिकेतील बालकलाकार आरुष बेडेकर, ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेला प्रणव पिंपळकर या  कलाकारांच्या  अभिनयाने  हा  व्हिडीओ साकार झाला आहे.  मराठी सोबत दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या स्वरांनी मने जिंकणारा पार्श्वगायक अभय जोधपूरकर याचा स्वरसाज गाण्यांना  लाभला असून प्रसाद प्रभाकर शिंदे यांनी  हा  म्युझिक व्हिडीओ संगीतबद्ध केला आहे.  विशेष  म्हणजे   म्युझिक व्हिडीओसाठी  मतिमंद व अनाथ शाळेतील मुलांना  सहभागी करून घेत  समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न निर्माते  आनंद पिंपळकर यांनी केला आहे.  

माणूस कितीही संकटात, अडचणींमध्ये असला तरी स्वामींच्या आशीर्वादाचा विश्वास हा प्रत्येकाच्या स्मरणात कायम असतो हाच विश्वास  स्वामी माझी आई' या म्युझिक व्हिडीओमधून प्रत्ययास  येतो.   

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight