'विषय हार्ड' चा ट्रेलर रिलीज...
"विषय हार्ड" चा ट्रेलर रिलीज... ' १२ वर्षांचं प्रेम आणि वाचवायला फक्त ५ तास मराठी चित्रपटसृष्टीत नवीन आयाम घेऊन येणारा 'विषय हार्ड 'हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याचा टीझर आणि गाणी यापूर्वीच प्रदर्शित झालेली आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनोख्या प्रेम कथेला फुलवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एका बाजूला खळखळून हसवणारा आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला लावणाराही आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरमधील दृश्ये आणि संवाद चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवणारे आहेत. ही नेहमीची प्रेमकथा नाही कारण त्यातील नायक- नायिकेसमोर एक वेगळीच परिस्थिती निर्माण होते. त्यांचं १२ वर्षांचं प्रेम आहे आणि वाचवायला फक्त ५ तास आहेत आणि परिस्थितीमधील विचित्र संकटांना तोंड देताना जो गोंधळ उडतो, त्यातून हास्यकल्लोळ निर्माण होतो, त्याचबरोबर काही वेळा गंभीर परिस्थितीही निर्माण होते. हे सर्व प्रसंग अतिशय कलात्मक पद्धतीने एकमेकांत गुंफण्यात आले आहेत. या चित्रपटामधून प्रेक्षकांना मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या रंगांची सफर घडणार आहे. ग्रा...