अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी पुन्हा जमली

अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी पुन्हा जमली

आजवर रुपेरी पडद्यावर नायक नायिकेच्या अनेक लोकप्रिय जोड्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावेलवकरच पुन्हा एकदा ही जोडी घरत गणपती या मराठी  चित्रपटाच्या निमित्ताने रसिक दरबारी हजेरी लावणार आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या सुरेख टीझर नंतर हा चित्रपट रसिकांसाठी वेगळी ट्रीट असणार हे नक्की.

 पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या संयुक्त  विद्यमाने घरत गणपती हा भव्य चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठकअभिषेक पाठकनम्रता बांदिवडेकरनवज्योत नरेंद्र बांदिवडेकरगौरी कालेलकर-चौधरी यांनी घरत गणपती  चित्रपटाची  निर्मिती  केली आहे.

शरद घरत आणि अहिल्या घरत या व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. या चित्रपटात  अजिंक्य देव  आपल्याला कुटुंबवत्सल पतीप्रेमळ वडिल अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी भावे साकारणार आहेत.

याआधी ‘शाब्बास सूनबाई’,‘मायेची सावली’,‘चल गंमत करू’, ‘सरकारनामा’ या चित्रपटांद्वारे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावर चांगलीच खुलली आता २५ वर्षांनी घरत गणपती चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमची  केमिस्ट्री रसिकांना आनंद देईल, असं हे दोघे सांगतातचित्रपटाचा सुंदर विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला.

आधीच्या  चित्रपटातील या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली असल्याने ही जोडी पुन्हा एकत्र असणं हा घरत गणपती’ चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. श्री गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने घरत कुटुंबातल्या अनुबंधाची हलकी-फुलकी गोष्ट  घरत गणपती चित्रपटात  पहायला मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight