'सन मराठी'वर 'तिकळी' ही मालिका १ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

"तीन मुलांनंतर झालेली मुलगी अपशकुनी असते","तिकळी"या नव्या मालिकेत किरण माने भन्नाट,खतरनाक,अंधश्रद्धाळू खलनायकाची भूमिका साकारणार  

मुंबई, २८ जून २०२४ :नवी मालिका आणि नव्या भूमिकेतून किरण माने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'तिकळी' असं किरण मानेंच्या नव्या मालिकेचं नाव असून या मालिकेत किरण माने खलनायकाची अत्यंत निर्दयी, क्रूर, अंधश्रद्धाळू असा बाबाराव उर्फ रणजीत खोत ! भूमिका साकारताना दिसणार आहेत. बाबाराव उर्फ रणजीत खोत अंधश्रद्धाळू असला तरी मालिका 'तिकळी' या अंधश्रद्धेच्या विरोधातली आहे.या मालिकेत मानेंचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. किरण मानेंना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 

माने हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'मुळे ते चर्चेत आले होते. 'मुलगी झाली हो' या मालिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. 'माझ्या नवऱ्याची बायको', 'पिंपळपान', 'भेटी लागी जीवा', 'सिंधुताई माझी माई' या मालिकांमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते. आता पुन्हा एकदा ते टेलिव्हिजनवरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.                  

'तिकळी' ही मालिका सन मराठीवर सुरू होणार आहे. १ जुलैपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम पूजा ठोंबरे आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांच्या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर अभिनेता पार्थ घाटगे तिकळी मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. 

एक जुलैपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री १० वाजता 'सन मराठी'वर 'तिकळी' ही मालिका बघायला विसरू नका. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO