'सुख कळले'मध्ये नवा ट्विस्ट; नव्या पात्राच्या एन्ट्रीने प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार

 'सुख कळले'मध्ये नवा ट्विस्ट; नव्या पात्राच्या एन्ट्रीने प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार

कलर्स मराठीवरील 'सुख कळले' या लोकप्रिय मालिकेत आता रंजक वळण येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे. एकीकडे माधवच्या आकस्मिक निधनानंतर मिथिलाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. तर दुसरीकडे कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचा डोलारा स्वतःच्या  खांद्यावर घेत ती पुन्हा एकदा नोकरी करण्याचा निर्णय घेणार आहे. घर आणि नोकरी दोन्ही सांभाळणारी एक खंबीर मिथिला आपल्याला नव्याने पाहायला मिळणार आहे.

'सुख कळले' मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री होत आहे. हे पात्र मिथिलाच्या खडतर प्रवासात तिची मदत करेल? की तिचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणार? हे पात्र सकारात्मक की नकारात्मक असणार असे अनेक प्रश्न रसिकांना पडले आहेत. त्यामुळे आता 'सुख कळले' मालिकेत पुढे काय होणार, याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे. कोण असेल हा नवा चेहरा? कोण येणार मिथिला आणि कामेरकर कुटुंबियांच्या आयुष्यात? पण हे पात्र मनोरंजक असणार एवढं नक्की. या नव्या पात्राच्या प्रवेशाने मालिकेत एक नवी ऊर्जा आणि नवी उत्सुकता येणार हे नक्कीच!

पाहा 'सुख कळले' सोमवार - शुक्रवार  रात्री 9 वाजता फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही  #JioCinema वर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight