‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी व मा.श्री. अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार

 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी व मा.श्री. अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार

तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान.

नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून २०२४ रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मा.श्री. अशोक सराफ आणि मा.श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार व इतर मान्यवर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाटय संकुलाच्या नूतनीकरणानंतर यशवंत नाट्य मंदिर रसिकार्पण सोहळा देखील संपन्न झाला. ह्या सोहळ्याला अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार साहेबनाटयसंमेलनाध्यक्ष मा.डॉ. जब्बार पटेलअ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त मा.श्री. शशी प्रभूउद्योगमंत्री तथा अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.ना.श्री. उदय सामंतअ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.श्री.मोहन जोशीअ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.श्री.अशोक हांडेपोलीस आयुक्त मा.श्री. विवेक फणसळकरयांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच ह्या सोहळ्यात प्रायोगिक ८ पारितोषिकेव्यावसायिक १४ पारितोषिके आणि नाट्य परिषदेकडून देण्यात आलेली १३ पारितोषिके अशी एकूण ३५ पारितोषिके प्रदान करण्यात आली.


शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नाट्य कलेचा जागर महोत्सवमध्ये अंतिम फेरीत बालनाट्यनाट्यछटानाट्यसंगीत पद गायनएकपात्रीनाट्य अभिवाचनएकांकिका ह्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे सादरीकरण झाले.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO