वरूण नार्वेकर दिग्दर्शित, जिओ स्टुडिओजच्या "एक दोन तीन चार" या चित्रपटाचा टीझर आऊट

वरूण नार्वेकर दिग्दर्शित, जिओ स्टुडिओजच्या "एक दोन तीन चार" या चित्रपटाचा टीझर आऊट

अनपेक्षित सरप्राईज हे नेहमीच धक्का देवून जातं हे खरं मानता येईल कदाचित! होय कारण नुकताच "एक दोन तीन चार" या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  त्यात सम्या आणि सायलीच्या क्युट लवस्टोरीत एक मोठ्ठा बॉम्ब फुटलाय आणि या जोडप्याच्या आयुष्यातला हा अनोखा ट्विस्ट काय आहे ह्याची छोटीशी झलक आपल्याला टीझर मधून कळते.  आता हा हॅपिनेस चा बुम्म त्यांच्या आयुष्यात काय काय वाढून ठेवणार आहे,हे आपल्याला येत्या १९जुलै लाच समजेल. 

या चित्रपटात मुख्य भूमिकेत वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इ. कलाकर आहेत इतकच नव्हे तर ‘फोकस इंडियन‘ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मिडीया इन्फ्लुन्सर ‘करण सोनावणे‘ सुद्धा दिसणार आहे 

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मीत बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांच्या साहाय्याने "एक दोन तीन चार" हा  वरूण नार्वेकर दिग्दर्शित मराठी सिनेमा १९ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Teaser link- https://youtu.be/hVsSo0AN42I?si=_RJ29rG_QJrFn89Z

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO