द महाराष्ट्र फाईल्स’ सिनेमातील ‘छम्मो’ गाण्याची चर्चा, गौतमी पाटीलच्या अदांची भुरळ

सबसे कातिल गौतमी पाटीलचं 'छम्मो' हे energetic गाणं प्रदर्शित, थिरकायला पाडतंय भाग

'द महाराष्ट्र फाईल्स’ सिनेमातील ‘छम्मो’ गाण्याची चर्चा, गौतमी पाटीलच्या अदांची भुरळ

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार नृत्यशैलीने वेगळी ओळख निर्माण करणारी गौतमी पाटील आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आगामी बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’मधील ‘छम्मो’ हे झिंगाट आणि एनर्जेटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आणि या ‘छम्मो’ या गाण्यात सबसे कातिल गौतमी पाटीलचा भन्नाट डान्स, आकर्षक लूक आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्स पाहायला मिळत आहे. तुफान बीट्स, उत्साहवर्धक संगीत आणि भव्य सादरीकरणामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

हे गाणं रिलीज होताच गाण्याला YouTube वर प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. हे गाणं SKR Music And Movies या YouTube चॅनलवर प्रदर्शित करण्यात आलं असून, मराठी प्रेक्षकांसाठी आणखी एक सुपरहिट डान्स नंबर ठरण्याची चिन्हं दिसत आहेत. गौतमी पाटीलने ठेका धरलेल्या या गाण्याचे बोल शकील आझमी यांनी लिहिले आहेत. तर संगीत सिद्धार्थ कश्यप यांचे आहे. तर हे एनर्जेटिक गाणं राजा हसन आणि साक्षी होळकर यांनी त्यांच्या दमदार आवाजात सुरबद्ध केलं आहे.

बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी दाखविण्यात आलेली ही भारतातील पहिली फिल्म आहे. या संपूर्ण कलाकृतीमागे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते संजीव कुमार राठोड यांची भन्नाट कल्पकता आणि कलात्मक दृष्टिकोन आहे. त्यांच्या 'कुशाग्र बुद्धी'तून साकारलेला हा सगळा खेळ प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. तर सह निर्माती म्हणून शालिनी राठोड यांनी बाजू सांभाळली आहे . तर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून आर्यन राठोड याने धुरा सांभाळली. या चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर शादाब अख्तर, विकास कुमार मिश्रा हे आहेत.

या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट येत्या २९ मे २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO