हरियाणवी धग आता मराठी मातीत उतरणार, ‘मार तू शिक्का’..

हरियाणवी धग आता मराठी मातीत उतरणार, ‘मार तू शिक्का’ गाण्यात सपना चौधरीचा भन्नाट डान्स

’द महाराष्ट्र फाईल्स’ मधील मार तू शिक्का गाणं प्रदर्शित, सपना चौधरी-नागेश भोसलेचा जबरदस्त परफॉर्मन्स

हरियाणाची धडाकेबाज क्वीन सपना चौधरी आता महाराष्ट्राच्या रंगमंचावर आपली खास छाप उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. निमित्त आहे येत्या २९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या बहुचर्चित चित्रपटाचे. या चित्रपटातील "मार तू शिक्का" हे गाणं सध्या चर्चेचा विषय ठरत असून, हरियाणवी तडका आणि मराठी ठसका यांचा भन्नाट संगम या गाण्यात पाहायला मिळणार आहे.

"तेरी आँखों का ए काजल", "काला चष्मा", "घुंघट" यांसारख्या गाण्यांमधून सपना चौधरीने नृत्त्यकला पेश केली तेव्हा संपूर्ण हरियाणा तिच्या तालावर थिरकला होता. आता हाच जलवा ती महाराष्ट्रात घेऊन येत आहे. "मार तू शिक्का" या गाण्यात तिची अदा, तिचा आत्मविश्वास आणि स्टेजवरील दबदबा पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावणार आहे.

या गाण्याला मराठी संगीतविश्वातील दिग्गजांचा दमदार आवाज लाभला आहे. आदर्श शिंदे यांच्या जोशपूर्ण गायकीसोबत सपना चौधरी यांची स्टाईल अशी काही जुळून आली आहे की, हे गाणं रिलीजपूर्वीच चर्चेचा विषय बनलं आहे. त्याचबरोबर आनंद शिंदे आणि वैशाली म्हाडे यांच्या आवाजाने गाण्याला आणखी रंगत आणली आहे.

या संपूर्ण कलाकृतीमागे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते संजीव कुमार राठोड यांची भन्नाट कल्पकता आणि कलात्मक दृष्टिकोन आहे. त्यांच्या 'कुशाग्र बुद्धी'तून साकारलेला हा सगळा खेळ प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. संगीतकार नितीन सावंत आणि अभिजीत यांनी गाण्याला असा ठेका दिला आहे की, थिएटरमध्ये बसलेला प्रत्येक प्रेक्षक नकळत थिरकू लागेल.

विशेष म्हणजे, अभिनेते नागेश भोसले यांना या गाण्यात ज्या अंदाजात पाहायला मिळणार आहे, तो त्यांच्या चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज ठरणार आहे. गीतकार दीपक आंगेवार, सुशील राठोड आणि विनायक पवार यांनी शब्दांद्वारे गाण्याचा जोश वाढविला आहे. "मार तू शिक्का" हे गाणं केवळ एक आयटम साँग न राहता जनतेच्या ओठांवरचं गाणं बनत आहे.

हरियाणा जसा आपल्या गव्हासाठी, शेतासाठी आणि रांगड्या संस्कृतीसाठी ओळखला जातो, तसंच सपना चौधरी यांच्या गाण्यांसाठीही प्रसिद्ध आहे. आता तीच हरियाणवी धग महाराष्ट्राच्या मातीत उतरत आहे. त्यामुळे "मार तू शिक्का" हे गाणं महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घालणार, यात अजिबात शंका नाही.

२९ मे रोजी द महाराष्ट्र फाईल्स प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना केवळ एक चित्रपट नाही, तर हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्या संस्कृतीचा तुफानी संगम अनुभवायला मिळणार आहे. आणि या संगमावर सपना चौधरी यांचा "मार तू शिक्का" नक्कीच उमटणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO