हसवणार... घाबरवणार... आणि वेड लावणार ! ‘भूतम भयम्’ २४ जुलैला थिएटरमध्ये धडकणार

रील्सवर धुमाकूळ घालणारी 'आँरेज ज्यूस गँग' आता भुतांच्या गोंधळात मोठ्या पडद्यावर ! 

हसवणार... घाबरवणार... आणि वेड लावणार! 'भूतम भयम्' २४ जुलैला थिएटरमध्ये धडकणार

मनोरंजनाचा दर्जा कायम राखत नवनवीन आणि हटके विषय प्रेक्षकांसमोर आणणारे झी स्टुडिओज आणि कायरा कुमार क्रिएशन्स आता प्रेक्षकांसाठी आणखी एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ हा भन्नाट हॉरर-कॉमेडी चित्रपट येत्या २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

भय आणि हास्य यांचं जबरदस्त मिश्रण असलेल्या या चित्रपटात सोशल मीडियावरील आपल्या भन्नाट रील्स, कॉमिक टायमिंग आणि मजेशीर कंटेंटमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे स्टार कॅान्टेन्ट क्रिएटर्स पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. या चित्रपटात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम एका हटके आणि धम्माल अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटाच्या नावातच रहस्य, मजा आणि थोडासा गोंधळ दडलेला असताना, या हॉरर-कॉमेडीमागची नेमकी कथा काय आहे? हे सगळे कोणत्या भानगडीत अडकणार आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. 

दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर म्हणाले, ''हा चित्रपट मराठीतील नव्या दमाच्या फळीने मांडलेला युथफुल विचार आहे .लेखक-दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिला चित्रपट. प्रेक्षकांना विलक्षण थिएटरीकल अनुभव देण्यासाठी 'भूतम भयम्' ची टीम २ वर्षांपासून मेहनत घेतेय.सात बेरोजगार मित्रांची ही गोष्ट हॅारर कॅामेडीच्या एका अद्भुत जगात प्रेक्षकांना घेऊन जाईल . दंतकथेचं हे जग मराठीत पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय.''

निर्माते नरेन कुमार म्हणतात, ''निर्माता म्हणून हिंदीत 'जॅाली.एल्.एल्.बी' सारखा चित्रपट केल्यानंतर मराठीत एक विलक्षण थिएटरीकल अनुभव देणारा चित्रपट करावा असं कायम मनात होतं. 'भूतम भयम्' हा तो भव्य अनुभव आहे असं मी म्हणेन ! दृश्यसंकल्पना हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी लागणारं  सगळं तांत्रिक,कलात्मक पाठबळ निर्माता म्हणून देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केलाय ! झी स्टुडिओज् सारख्या अनुभवी स्टुडिओची प्रस्तुतकर्ता म्हणून लाभलेली साथ नक्कीच मोलाची आहे. 'भूतम भयम्' हॅारर कॅामेडी विश्वातला गेमचेंजर ठरेल यात शंका नाही . हिंदी हॅारर सिनेमांना मराठीने दिलेलं हे उत्तर असेल.''

निर्माते महेश ज्ञानदेव कोरडे म्हणतात, ''मराठी चित्रपट म्हणजे कमी बजेटचा, कमी क्वालिटीचा चित्रपट असा इतर इंडस्ट्रीतल्या लोकांचा समज आहे. 'भूतम भयम्' हा त्या सगळ्यांना दिलेल उत्तर आहे . उत्तम प्रोडक्शन बजेट , दर्जेदार दृश्य आणि सकस आशय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.चित्रपटाचे  तंत्रज्ञ ,कलाकार यांचं  सरासरी वय २८ -३० वर्षं आहे . हा चित्रपट मराठीतला तरुण चित्रपट आहे असं मी म्हणेन.या नव्या दमाच्या टीमने मोठ्या जबाबदारीने 'भूतम भयम्' जन्माला घातलाय. निर्माता म्हणून मला नक्कीच याचा अभिमान आहे.''

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “झी स्टुडिओजच्या माध्यमातून आम्ही नेहमीच वेगळे आणि प्रेक्षकांशी जोडले जाणारे विषय घेऊन येतो. कायरा कुमार क्रिएशन्ससोबतच्या आमच्या या सहयोगातून ‘भूतम भयम्’सारखी युथफुल आणि एनर्जेटिक हॉरर-कॉमेडी प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला आनंद होत आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली ‘ऑरेंज ज्यूस गँग’ आता मोठ्या पडद्यावर पाहाणं हा प्रेक्षकांसाठी निश्चितच एक भन्नाट अनुभव ठरेल.''

या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे यांनी केली असून, कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी रामचंद्र अरुण गांवकर  यांनी सांभाळली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable