महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला सातारा जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधींची भेट

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला सातारा जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधींची भेट

मुंबई. दि. १४ मे, २०२६ : मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला सातारा जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधींनी भेट देत विविध स्टॉल्सची पाहणी केली. यामध्ये नगराध्यक्षा म्हसवड पूजा सचिन विरकर, मा. नगराध्यक्षा वडूज सौ. रेश्मा श्रीकांत बनसोडे, मा. नगराध्यक्षा वडूज मनिषा काळे, मा. नगराध्यक्षा दहिवडी निलम जाधव तसेच भा.ज.पा. महिला मोर्चा म्हसवड मंडल अध्यक्षा सौ. अर्चना सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच म्हसवड, दहिवडी आणि वडूज नगरपालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांनीही प्रदर्शनाला भेट दिली.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ, ग्रामीण उत्पादनं तसेच महिला उद्योजकांनी उभारलेल्या विविध व्यवसायांची माहिती घेतली. प्रदर्शनामध्ये महिलांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “ मा. जयकुमार गोरे यांनी आम्हाला येथे येऊन महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट देण्यास सांगितले. येथे महिलांनी उभारलेले विविध उद्योग, त्यांची मेहनत आणि आत्मविश्वास पाहून प्रेरणा मिळाली. अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन सातारा जिल्ह्यातही अधिकाधिक महिला उद्योजकांना व्यासपीठ आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 

यावेळी मंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ. सोनिया गोरे याही उपस्थित होत्या. त्यांनी विविध स्टॉल्सना भेट देत महिला बचत गटांच्या उत्पादनांची माहिती घेतली तसेच ग्रामीण महिलांच्या कौशल्याचे कौतुक केले. महिलांना स्वावलंबी बनविणाऱ्या अशा उपक्रमांना अधिक बळ मिळावे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO