एचपीसीएल आणि टाटा मोटर्स..

एचपीसीएल आणि टाटा मोटर्स यांची वापरलेल्या ऑटोमोटिव्ह ल्युब्रिकंट्ससाठी विस्तारक्षम सर्क्युलर इकॉनॉमी मॉडेल विकसित करण्यासाठी भागीदारी

मुंबई, २६ मे २०२६ : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल), ही महारत्न तेल विपणन कंपनी, आणि टाटा मोटर्स, भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी, यांनी वापरलेल्या ऑटोमोटिव्ह ल्युब्रिकंट्सच्या जबाबदार संकलन आणि पुनर्वापरासाठी संरचित आणि विस्तारक्षम मॉडेलची चाचणी करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे.

हा सहयोग भारतातील दोन अग्रगण्य संस्थांच्या परस्परपूरक क्षमतांना एकत्र आणत महत्त्वाच्या शाश्वतता आव्हानाला सामोरे जाण्यास मदत करतो. तसेच, भारताच्या विकसित होत असलेल्या एक्स्टेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी (EPR) फ्रेमवर्कचे पालन करण्यास समर्थन देत देशाच्या सर्क्युलर इकॉनॉमी उद्दिष्टांना पुढे नेण्याचे कामही करतो.

या उपक्रमाचा उद्देश वापरलेल्या ल्युब्रिकंट्सचे ज्यांना घातक कचऱ्याच्या श्रेणीत वर्गीकृत केले जाते संकलन, साठवण आणि पुनर्वापर यासाठी एक संघटित व ट्रेसेबल प्रणाली उभारणे हा आहे. या प्रक्रियेमुळे उच्च दर्जाच्या री-रिफाइंड बेस ऑइलमध्ये रूपांतर शक्य होईल, ज्यामुळे संसाधन कार्यक्षमता वाढेल आणि पर्यावरणीय धोका कमी होईल. हा पायलट प्रकल्प जबाबदार कचरा व्यवस्थापनासाठी नवे मापदंड निर्माण करेल आणि भारताच्या सर्क्युलर तसेच संसाधन-कार्यक्षम अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या संक्रमणाला पाठबळ देईल, अशी अपेक्षा आहे.

पायलट प्रकल्पाच्या शुभारंभावेळी श्री चि. श्रीनिवास, कार्यकारी संचालक, ल्युब्स, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) म्हणाले,वापरलेल्या तेलामध्ये खरी सर्क्युलॅरिटी साध्य करण्यासाठी री-रिफाइंड बेस ऑइलचा तयार ल्युब्रिकंट्समध्ये पुन्हा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टाटा मोटर्ससोबतचा आमचा हा सहयोग वापरलेल्या तेलाच्या सर्क्युलॅरिटीसाठी विस्तारक्षम मॉडेल उभारण्याच्या आणि कार्यप्रणालीतील कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

या भागीदारीबाबत प्रतिक्रिया देताना श्री विक्रम अग्रवाल, हेड, पार्ट्स अँड सर्व्हिसेस, टाटा मोटर्स लिमिटेड म्हणाले, “ वापरलेले ऑटोमोटिव्ह ल्युब्रिकंट्स जबाबदारीने हाताळले गेले नाहीत, तर त्याचा दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम होऊ शकतो. या आव्हानाचा सामना करण्यासाठी विश्वासार्ह भागीदार, स्पष्ट प्रक्रिया आणि मोठ्या प्रमाणावर कार्य करण्याची क्षमता आवश्यक आहे. एचपीसीएल हे टाटा मोटर्सचे अनेक स्तरांवर विश्वासू भागीदार राहिले आहे आणि या सहयोगामुळे आम्हाला संघटित व जबाबदार पुनर्वापराच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल उचलता येत आहे. दोन्ही संस्थांच्या एकत्रित क्षमतांच्या बळावर, हा पायलट प्रकल्प उद्योगस्तरावर व्यापक स्वीकारासाठी एक मजबूत पाया उभारण्यास मदत करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

या भागीदारीअंतर्गत, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) अधिकृत संकलन यंत्रणांच्या माध्यमातून वापरलेल्या ल्युब्रिकंट्सचे संकलन आणि वाहतूक व्यवस्थापनाचे नेतृत्व करेल तसेच ते नोंदणीकृत पुनर्वापरकर्त्यांकडे योग्य पद्धतीने पोहोचवले जातील याची खात्री करेल.

टाटा मोटर्स आपल्या विस्तृत अधिकृत सेवा नेटवर्कचा वापर करून संरचित संकलन सक्षम करेल आणि आपल्या संपूर्ण इकोसिस्टममध्ये जबाबदार विल्हेवाट पद्धतींना प्रोत्साहन देईल.

हा पायलट प्रकल्प निवडक राज्यांमध्ये राबविण्यात येणार असून, दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या संयुक्त समितीद्वारे त्याचे संचालन केले जाईल. ही समिती प्रकल्पाच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्याबरोबरच त्याच्या विस्तारक्षमतेचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी पार पाडेल.

एक सर्वसमावेशक मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता म्हणून, टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओला ‘संपूर्ण सेवा 2.0’ द्वारे पूरक सेवा प्रदान करते.यामध्ये निश्चित टर्नअराउंड टाइम, वार्षिक देखभाल करार आणि मूळ स्पेअर पार्ट्सची उपलब्धता यांसह वाहनांच्या संपूर्ण जीवनचक्रासाठी एंड-टू-एंड सोल्यूशन्सचा समावेश आहे.

या सेवा ‘फ्लीट एज’ या टाटा मोटर्सच्या कनेक्टेड वाहन प्लॅटफॉर्ममुळे अधिक सक्षम बनतात, जे डेटा-आधारित फ्लीट ऑप्टिमायझेशन आणि वाहनांचा अधिक कार्यक्षम वापर सुनिश्चित करते.टाटा मोटर्सचे भारतभरात ४,५०० हून अधिक विक्री आणि सेवा केंद्रांचे विस्तृत नेटवर्क कार्यरत आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO