“याड लागलं” हे रोमॅंटिक गाणं प्रदर्शित..

 अभिनेत्री पूजा चव्हाण आणि अभिनेता आकाश यादव यांचं “याड लागलं” हे रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक मनमोहक नविन गाणं “याड लागलं” प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रेक्षकांना एक ताजं आणि हृदयस्पर्शी संगीत अनुभव देण्याचे वचन देतं. गाण्यात “पुन्हा कर्तव्य आहे” या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा चव्हाण आणि अभिनेता आकाश यादव यांची नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. समाधान पवार, सुबोध गोतपागर, शुभम यादव, आकाश यादव यांनी या गाण्याची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. या गाण्याला दर्शन सुतार यांनी संगीत दिलं असून गायक निखिल मधाळे यांनी हे गाण गायलं आहे. शिवाय या गाण्याची गीतरचना आकाश यादव यांनी केली आहे. 

याड लागलं या गाण्याचे चित्रीकरण सचिन घाटगे यांनी केले असून व्हिडीओ एडीटींग आकाश यादव यांनी केले आहे. रूपेश जाधव मेकअप आणि दत्तात्रय पवार यांनी हेअर आर्टीस्टची जबाबदारी सांभाळली आहे. हे गाणं साताऱ्यातील दुर्गळवाडी मधील निसर्गरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं अशा तरुण प्रेमकथांची कहाणी सांगतं, जे साधं व निस्वार्थ प्रेम करून भविष्याचे स्वप्न रंगवतात.

मराठी वर्ल्ड प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या “याड लागलं” गाण्याचे अभिनेते आकाश यादव या गाण्याविषयी सांगतात, "आजच्या सोशल मीडियाच्या जगात असं निस्वार्थ प्रेम करणारी माणसं सहज मिळत नाहीत, पण गावातील एक साधं, सुंदर प्रेम करणा-या दोन प्रेमीयुगुलांची ही सुंदर कथा या गाण्यात दर्शवली आहे. मला खात्री आहे हे गाणं सर्व प्रेक्षकांना नक्की आवडेल व त्यांना या गाण्याचं नक्की याडं लागेल. गाण्याच्या शूटला खूप मज्जा आली. प्रेक्षकांना गाण खूप आवडत आहे. गाण इंस्टावर ट्रेंडिंगला गेल आहे. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की गाण्यावर प्रेम करा आणि या गाण्यावर व्हिडिओ बनवून आमच्यासोबत शेयर करा.”

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable