दीपा ज्वेलर्स लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ)

 दीपा ज्वेलर्स लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) मंगळवार, ०१ सप्टेंबर २०२६ रोजी उघडणार, प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा (Price Band) ₹१६८ ते१७७ निश्चित

(डावीकडून उजवीकडे): मुंबईत कंपनीच्या आयपीओच्या (IPO) शुभारंभप्रसंगी 'दीपा ज्वेलर्स लिमिटेड'चे पूर्णवेळ संचालक श्री. देव अग्रवाल आणि सीएमडी (CMD) श्री. आशिष अग्रवाल.)

·       प्रत्येक दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्ससाठी१६८ ते१७७ प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा निश्चित

·       बिड/ऑफर सुरू होण्याची तारीखमंगळवार, ०१ सप्टेंबर २०२६ आणि बिड/ऑफर बंद होण्याची तारीखगुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६.

·       किमान बिड लॉट ८४ इक्विटी शेअर्सचा आहे आणि त्यानंतर ८४ इक्विटी शेअर्सच्या पटीत बिड करता येईल.

दीपा ज्वेलर्स लिमिटेडने (कंपनी) आपल्या पहिल्या इनिशियल पब्लिक ऑफरसाठी (आयपीओ) प्रत्येक दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची किंमत१६८ ते१७७ प्रति इक्विटी शेअर निश्चित केली आहे.

कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग ("आयपीओ" किंवा "ऑफर") सबस्क्रिप्शनसाठी मंगळवार, ०१ सप्टेंबर २०२६ रोजी उघडेल आणि गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल.

गुंतवणूकदार किमान ८४ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ८४ च्या पटीत अर्ज करू शकतात. आजच्या तारखेनुसार, कंपनीकडे ,२०,००,००० इक्विटी शेअर्स आऊटस्टॅडिंग आहेत.

या ऑफरमध्ये,५००.०० दशलक्ष (₹२५० कोटी) पर्यंतचा नवीन इश्यू (Fresh Issue) आणि प्रमोटर सेलिंग शेअरधारकांद्वारे ११,८४८,३४० पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची विक्री (Offer-for-Sale) समाविष्ट आहे. यामध्ये आशिष अग्रवाल यांच्याद्वारे ,९२४,१७० पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि सीमा अग्रवाल यांच्याद्वारे ,९२४,१७० पर्यंतचे इक्विटी शेअर्स विकले जाणार आहेत.

नवीन इश्यूद्वारे प्राप्त होणाऱ्या,५००.०० दशलक्ष (₹२५० कोटी) रक्कमेचा उपयोग कंपनीच्या दीर्घकालीन खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी (इन्व्हेंटरी खरेदी, देखभाल आणि विस्तार), सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी आणि ऑफरच्या खर्चासाठी केला जाईल.

ही ऑफर सेबी (कॅपिटल आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१८ ("SEBI ICDR Regulations") नुसार बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केली जात आहे. यामध्ये ऑफरचा कमाल ५०% भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs), किमान १५% भाग बिगर-संस्थात्मक बोलीदारांसाठी (NIIs), आणि किमान ३५% भाग किरकोळ वैयक्तिक बोलीदारांसाठी (RIIs) उपलब्ध असेल.

२०१६ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी एक संघटित B2B डिझायनर, प्रोसेसर आणि हॉलमार्क सोन्याच्या दागिन्यांची पुरवठादार आहे. कंपनीचे कामकाज प्रामुख्याने तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये आहे. क्रिसिल (CRISIL) अहवालानुसार, ही कंपनी वड्डानम (वड्डाणम) आणि सीएनसी मशिन कट बांगड्यांची प्रमुख प्रोसेसर आणि पुरवठादार आहे, जी ज्वेलरी रिटेल चेन्स आणि स्वतंत्र स्टोअर्सना पुरवठा करते.

ही कंपनी थेट अंतिम ग्राहकांना विक्री करण्याऐवजी रिटेल चेन्स आणि स्वतंत्र स्टोअर्ससारख्या इतर व्यवसायांना दागिन्यांचे डिझायनिंग, उत्पादन आणि सोन्याच्या दागिन्यांचा पुरवठा करणारी संघटित बिझनेस-टू-बिझनेस (B2B) कंपनी आहे.

कंपनी २२ कॅरेट सोन्याचे दागिने तयार करणे पुरवणे, जॉब-वर्क सेवा देणे आणि दागिने संबंधित उत्पादनांच्या व्यापारात कार्यरत आहे. कंपनी विविध प्रकारचे हॉलमार्क असलेले साधे सोन्याचे दागिने आणि मौल्यवान खडे जडवलेले दागिने डिझाइन, प्रोसेस आणि विक्री करते.

त्यांच्या उत्पादनांमध्ये प्रामुख्याने वड्डानम (कंबरपट्टा), सीएनसी मशिन कट बांगड्या, जेंट्स कडा, वंकी (बाजूबंद), दांडपट्टी, गुंडलामला हारम (पारंपारिक हार), गुंडलामला नेकलेस, कंगन, ईअररिंग्स, मांगटिका (कपाळावरील साखळी/बिंदी), मातील (कान-साखळी), चंपासरलू, जडा (वेणीचे दागिने), अंगठ्या, ब्रेसलेट्स आणि मौल्यवान खड्यांच्या अंगठ्या समाविष्ट आहेत.

मुख्य ज्वेलरी प्रोसेसिंग ऑपरेशन्स व्यतिरिक्त, कंपनी जॉब वर्कची कामे देखील करते, ज्यामध्ये ग्राहकांकडून मिळालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून तयार दागिने त्यांना परत दिले जातात. याशिवाय, कंपनी चांदीचे दागिने, १८ आणि २० कॅरेटचे सोन्याचे दागिने, मौल्यवान खडे आणि गोल्ड बुलियनच्या (सोन्याची नाणी/बिस्किटे) व्यापारातही कार्यरत आहे.

३१ जुलै २०२६ पर्यंत, कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये १६ उत्पादने आणि विविध श्रेणींमध्ये ११० SKUs समाविष्ट आहेत.

३१ जुलै २०२६ पर्यंत, कंपनीचे ग्राहक जाळे भारतातील १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेले असून एकूण ३७३ ग्राहक आहेत. यात ४७ ज्वेलरी रिटेल चेन्स आणि ३२६ स्वतंत्र स्टोअर्सचा समावेश आहे.

कंपनीच्या क्रिएटिव्ह डिझायनर्सच्या टीममुळे त्यांना डिझाइन्सचा मोठा आणि विस्तृत पोर्टफोलिओ सांभाळणे शक्य होते. विविध उत्पादन श्रेणी आणि डिझायनर्सच्या टीमच्या बळावर कंपनीने जोयालुकास इंडिया लिमिटेड, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड आणि ललिता ज्वेलरी मार्ट लिमिटेड यांसारख्या प्रमुख रिटेल चेन्स आणि स्वतंत्र स्टोअर्ससोबत दीर्घकालीन संबंध प्रस्थापित केले आहेत.

उत्कृष्ट कारागिरी आणि उत्पादनाची गुणवत्ता सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी कंपनीने गुणवत्ता नियंत्रण आणि चाचणीची (Quality Control & Assurance) मजबूत यंत्रणा लागू केली आहे.

तसेच, ब्रँडची ओळख, दृश्यमानता वाढवण्यासाठी आणि विशिष्ट उत्पादनांचे प्रमोशन करण्यासाठी कंपनी नियमितपणे B2B प्रदर्शनांमध्ये भाग घेते. ब्रँडची माहिती पोहोचवण्यासाठी आणि उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी कंपनी "Deepa Jewellers Limited" या थर्ड-पाटी मोबाईल ॲपचा वापर करते, जे २५ जून २०२१ रोजी सुरू करण्यात आले होते.

आर्थिक वर्ष २०२६ (FY26) मध्ये कंपनीचे ऑपरेशन्समधून मिळालेला महसूल१९,२६६.७६ दशलक्ष होते, जे आर्थिक वर्ष २०२४ (FY24) मध्ये१०,२४५.६८ दशलक्ष होते. तसेच, कंपनीचा करोत्तर निव्वळ नफा (PAT) FY26 मध्ये,०४७.८८ दशलक्ष राहिला, जो FY24 मध्ये२४३.४७ दशलक्ष होता.

एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि वाल्मिकी लीला कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत, आणि बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही रजिस्ट्रार (RTA) आहे.

कंपनीचे शेअर्स बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) वर सूचीबद्ध (List) करण्याचे प्रस्तावित आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

BlueStone Jewellery & Lifestyle IPO