फोर्स मोटर्सच्या ‘मोबाईल डिस्पेन्सरीच्या मदतीने 1,11,679 रुग्णांवर उपचार, कोविड-19 चा मुकाबला करताना महाराष्ट्र भागातील आरोग्य सुविधांवर येणारा ताण हलका होणार
  • डॉक्टर आपल्या दारी” उपक्रमाद्वारे फिरत्या दवाखान्यामार्फत 26 दिवसांत 1,11,679 रुग्णांवर उपचार
  • 1070 हून अधिक संशयित रुग्णांची महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांत पाठवणी
महाराष्ट्रएप्रिल, 2020: महाराष्ट्र राज्यात 26 एप्रिलपर्यंत कोविड-19 च्या 8000 च्या केस आढळल्या असून सर्वाधिक संसर्गग्रस्त म्हणून राज्य अग्रक्रमावर आहे. दरदिवशी पॉझिटिव्ह रूग्ण आढळत असल्याने सध्या राज्यातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर भरपूर ताण आहे. या समस्येच्या अनुषंगाने पुणे येथील मुख्य वाहन कंपनी फोर्स मोटर्सने भारतीय जैन संघटना (बीजेएस, पुणे) यांच्या समवेत महाराष्ट्रात “डॉक्टर आपल्या दारी” उपक्रमामार्फत फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या उपक्रमाची सुरुवात 1 एप्रिल रोजी झाली असून डॉक्टर, मदतनीस, औषधांनी सुसज्ज वॅन्समध्ये 30 फिरत्या दवाखान्यांची सोय करून दिली आहे. पूर्व-सूचित वेळापत्रकानुसार हे फिरते दवाखाने  आर्थिकदृष्ट्या कमकुवत भागांत जातात. या व्हॅनमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय मदतनीसांची संपूर्ण टीम सुसज्जित असून कोविड-19 ची लक्षणे रुग्णांमध्ये तपासण्यात येतात. ज्या रुग्णांमध्ये थेट संसर्ग आढळून येतो, त्यांना नियुक्त करण्यात आलेल्या रुग्णालयांत पाठवले जाते.
डॉक्टरांनी लिहून दिलेली किंवा उपलब्ध करून देण्यात येण्यात येणारी सर्व औषधे मोफत पुरवली जात आहेत. दरदिवशी मोबाईल युनिटसमध्ये 2,500 लोकांची तपासणी करण्यात येते आणि दिवसाला जवळपास 500 रुग्णांमध्ये लक्षणांची चाचपणी केली जाते. व्हॅनमधील डॉक्टर रुग्णांची ताप आणि सर्दी-खोकल्याची तपासणी करतात आणि त्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुपालन करण्याविषयी सांगतात. मागील 26 दिवसांत 1,11,679 अधिक रहिवाशांची तपासणी करण्यात आली असून 1070 हून जास्त कोविड-19 संशयित रुग्णांची पाठवणी सरकारी रुग्णालयांत करण्यात आली. कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. 
या उपक्रमाविषयी बोलताना फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसान फिरोदिया म्हणाले की, “देशात महाराष्ट्र राज्य हे कोरोनाकरिता हॉटस्पॉट ठरले आहे. त्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. या आदर्श उपक्रमासोबत हातमिळवणी करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे.”
ते पुढे बोलताना म्हणाले की, “या उपक्रमाव्यतिरिक्त आमचा समूह (डॉ. अभय फिरोदिया ग्रुप) ने कोविड-19 मदत कार्यासाठी रु 25 कोटींची तजवीज केली आहे. या आर्थिक तरतुदीचा विनियोग आरोग्य निगा पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण, रक्त संग्रह क्षमता वाढवणे, मोबाईल क्लिनिक/टेस्टींग क्षमता उपलब्ध करून देणे आणि गरजूंना मोफत अन्न पुरवठा करण्यासाठी वापरली जाणार आहे.
नागरीक तसेच स्थानिक प्रशासनाने हा उपक्रम आणि फोर्स मोटर्सचे स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे या उपक्रमाचा विस्तार मुख्य बाजारपेठा पुणे आणि पीसीएमसीऔरंगाबाद, धुळे, नाशिक, रत्नागिरी, सांगली, सोलापूर आणि महाराष्ट्रातील इतर शहरांत सुरू केला आहे. सुमारे 84 व्हॅन यापूर्वीच 1,11,679 रहिवाशांपर्यंत पोहोचल्या असून 1070 हून अधिक संशयित रुग्णांची महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांत पाठवणी करण्यात आल्याने हा देशातील सर्वात मोठा आरोग्यविषयक उपक्रम ठरला.
या उपक्रमाविषयी बोलताना बीजेएसचे संस्थापक शांतीलाल मुथा म्हणाले की, “ही संघटना तीन दशकांपूर्वी स्थापन झाली असून तेव्हापासून फिरोदिया कुटुंब सामाजिक कार्य उपक्रमांना मदत पुरवत आले आहे”.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार