स्टेपॲप

लॉकडाऊनचा परिणाम : स्टेपॲपची वाढती लोकप्रियता 
हे एज्यु –टेक व्यासपीठ क्षेत्रांना नाविन्यतेकडे वाटचाल करण्यास साह्य करत आहे 
(स्पेटॲपशालेय विद्यार्थ्यांसाठीचे हे गेमिफाइड लर्निंग ॲप लवकरच सर्व विषयांमध्ये नव्या स्वरुपात दाखल होणार)
मुंबई: नवे प्रयोगव्यवसायवृद्धी या संदर्भात जवळपास सर्वच क्षेत्र निश्चल स्थितीत असताना लॉकडाऊनने एज्यु-टेक क्षेत्राच्या वाढीला नकळत चालना दिली आहेवाढती मागणी आणि गरजा लक्षात घेऊन टेक-एज्युकेशन कंपन्या सातत्याने त्यांची व्यवसाय क्षितिजे रुंदावण्यासाठी प्रयत्न करत आहेतसवलतीच्या दरात ॲप उपलब्ध करून देण्यापासून अभ्यासक्रमात नवे घटक देत त्यांची व्याप्ती वाढवणे अशा अनेक उपक्रमांतून एज्यु-टेक कंपन्या या संकटकाळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ठरलेल्या साच्यापलिकडे जात आहेत.
स्टेपॲप या एज्यु-टेक क्षेत्रातील एका उदयोन्मुख कंपनीने वापरकर्ते आणि डाऊनलोड्सच्या वाढत्या संख्येच्या माध्यमातून हि संधी हुडकलली आहेस्टेपॲप या गेमिफाइड लर्निंग अॅपच्या वापरकर्त्यांमध्ये 15 मार्चपासून तीन लाखांहून अधिक वापरकर्त्यांची भर पडली आहेमागील चार महिन्यांत प्लेस्टोअर आणि अॅपस्टोरमधून या ॲपचे एकूण 2 मिलीयन डाऊनलोड झाले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात स्टेपॲप हा विद्यार्थ्यांना सीबीएसईआयसीएसई आणि एसएससी बोर्डानुसार गणित आणि विज्ञानाच्या संकल्पना गेमिफाइड पद्धतीने शिकण्यासाठीचा एक प्राधान्यक्रमाचा पर्याय ठरत आहे.
मागील काही महिन्यांमध्ये गेमिफाइड लर्निंग पद्धतींना बरीच लोकप्रियता लाभली आहेस्टेपॲपने नव्या विषयांसह हे ॲप नव्या स्वरुपात सादर करण्याचा निर्णय घेतला आहेआर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा परिणामकारक दृष्टिकोन बाळगत या ॲपवर शैक्षणिक बोर्डाच्या नियमांनुसार सोशल सायन्स आणि भाषा विषय यात समाविष्ट केले जाणार आहेतनव्याने सादर करण्यात आलेले विषय लवकरच सीबीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतीलइतर शैक्षणिक बोर्डांसाठीही अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया या ॲपने सुरू केली आहे.
सेग्रिगेटेड टॉपिक म्हणजेच प्रत्येक धड्यातील विभागवार मुद्द्यांसारख्या या ॲपवरील सुविधांमुळे विद्यार्थ्यांना संकल्पना अगदी सहज समजून घेता येतात आणि त्यांचा सराव करता येतो. सिम्प्लिफाइड टेस्टिंग मेथडॉलॉजीमुळे विद्यार्थ्याची प्रगती जाणून घेता येते आणि डॅशबोर्डमुळे नोंदणी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती गोळा केली जाते आणि आता यात नव्या विषयांचीही भर पडणार आहे.
"मागील 22 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्राचा भाग असल्याने आमचे उद्दिष्ट आहे प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट शिक्षण देणेमागील काही महिन्यांत आमच्या अॅपला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता सर्व विषय समाविष्ट करून या गरजेच्या काळात विद्यार्थी आणि शिक्षकांना ते उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहेम्हणूनजेव्हा परिस्थिती आमच्यासाठी फारशी अनुकुल नसेल तेव्हाही आमची टीम उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करत ॲप अधिक नाविन्यपूर्णसुधारित स्वरुपा उपलब्ध व्हावे, यासाठी काम करत असते," असे एज्युइजफन टेक्नॅलॉजीस (स्टेपॲप)चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापकपेसआयआयटी ण्ड मेडिकलचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण त्यागी म्हणाले.
स्टेपॲप बद्दल
स्टेपॲप हे गेमिफाइडपर्सनलाइज्डइंटरअॅक्टिव्ह आणि अडाप्टिव्ह (अनुकुलॲप पहिली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान हे विषय गमतीशीर आणि रंजक पद्धतीने शिकवते.
संकल्पना नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकवतानाच स्टेपॲप आपल्या सर्व भागधारकांना (पालकमुख्याध्यापकशिक्षक आणि धोरणकर्तेया शिकण्याच्या परिणामांची सदैव माहिती असावीयाची खातरजमाही करते.
10 वर्षांच्या सखोल संशोधनानंतर त्यांनी 400 हून अधिक आयआयटीअन्स आणि डॉक्टरांची एक टीम तयार केली आहेत्यामुळेस्टेपॲप हे एक असे अनोखे गेमिफाइड लर्निंग सॉफ्टवेअर उत्पादन आहे ज्यात संकल्पना स्पष्ट होतात.
वर्षभरापूर्वी 14 एकलव्य रेसिडेंशिअल मॉडेल स्कूलमध्ये स्टेपॲप सुरू करण्यात आले आणि या ॲपमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय परीक्षांमधील कामगिरी सुधारण्यात साह्य झाले तसेच ईएमआरएसचे 15 विद्यार्थी पहिल्यांदाच एनटीएसई परीक्षेच्या पहिल्या फेरीत निवडले गेलेविद्यार्थी आणि शिक्षकांचा प्रतिसाद पाहता आणखी 11 ईएमआरएसमध्ये स्टेपॲप सुरू केले जाणार आहेकेंद्र सरकारने भारतभरातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कूल्समध्ये स्टेपअॅपची शिफारस करणारे पत्र जारी केले आहे.
"आमच्या विद्यार्थ्यांना कायमच गणित आणि विज्ञान या विषयांची भीती वाटायचीमात्रएज्युइजफन ॲप (स्टेपॲप)चा वापर केल्यानंतर त्यांना खरंच हे विषय सोपे वाटू लागलेतत्यांना अत्यंत सोप्यास्पष्ट आणि नेमक्या पद्धतीने कंटेट हाताळता येतोअभ्यासाबरोबरच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी ते या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेतहे तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने अधिक परिणामकारक पद्धतीने शिकवणे शक्य करत आहे." - मुख्याध्यापकईएमआरएस चिखलदरा.
स्टेपॲपने तामिळनाडू सरकारसोबतही करार केला आहेयामुळे सरकारी शाळांमधील 10 लाख विद्यार्थ्यांना स्टेपॲपची सुविधा देण्यात येणार आहेस्टेपॲपने पोदार स्कूलसोबत सामंजस्य करार करून 1.5 लाख विद्यार्थ्यांना गृहपाठ आणि सरावासाठी साह्य देऊ केले आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण आणि शिकण्याचा अधिकार आहेकोणत्याही सामाजिक-आर्थिक दर्जाचा विचार न करता देशातील प्रत्येक मुलापर्यंत स्टेपॲप पोहोचावेहे आमचे लक्ष्य आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight