अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या टीमला मिस करतोय - आशुतोष पत्की
लॉकडाऊनमध्ये मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखीलघरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमुळे घराघरात बबडय़ा म्हणजेच सोहम या व्यक्तिरेखेची चर्चा असूनया व्यक्तिरेखेमुळे अभिनेता आशुतोष पत्की याचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहेबबडय़ा म्हणजेच आशुतोष त्याचा वेळ घरी कसा घालवतो याबद्दल आशुतोष सोबत साधलेला हा खास संवाद
 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवलं आहे हे ऐकल्यावर तुझी प्रतिक्रिया काय होती?
-  कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन हा सरकारने आपल्या सेफ्टीसाठी घेतलेला निर्णय आहे आणि तो योग्य आहेत्यामुळे आपण घरी राहून त्यांना सहकार्य करायला पाहिजे.
तू या मोकळ्या वेळेत काय करतोस?
-  मी घरी माझा वेळ माझ्या घरच्यांसोबत घालवतोयया मोकळय़ा वेळात मी अनेक गोष्टी शिकायचा प्रयत्न करतोयसध्या मी कूकिंग शिकतोयवेगवेगळय़ा रेसिपीज मी ट्राय करतोयघरच्यांना त्यांच्या कामात मदत करतोयस्वत:च्या हेल्थकडे लक्ष देतोय.
तुझं शेड्युल काय आहे सध्या?
या मोकळ्या वेळेत आपण अनेक छान वेब सिरीज किंवा चित्रपट बघू शकतोमी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चित्रपट बघतोहे माझं क्वारंटाईनचं शेडय़ुल बनलंय.
तू ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या टीमला किती मिस करतोय?
- ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेची संपूर्ण टीम माझं परिवारच आहेत्यामुळे मे त्यांना खूप मिस करतोयसगळे सेटवर माझी खूप काळजी घ्यायचेनिवेदिता ताई माझ्यासाठी खूप छान छान रेसिपीज बनवायच्याआम्ही सगळे व्हिडीओ कॉलवरून टचमध्ये आहोतदिवसातून १३ ते १५ तास आम्ही शूटिंग करायचो पण आता या सुट्टीमुळे सगळे निवांत आहेत.

तू आता सगळ्यात जास्त काय मिस करतोय?
मी ट्रॅव्हलिंग मिस करतोयजर मला इतकी मोठी सुट्टी मिळाली असती तर मी नक्कीच फॉरेन ट्रिपला गेलो असतोपण आताच्या परिस्थितीत आपण कुठेच बाहेर जाऊ शकत नाही आहोत म्हणूनच मी ट्रॅव्हलिंग मिस करतोय.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

भोईवाडा,परळ येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका पालखी सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार