हार्टफुलनेस
हार्टफुलनेसचे दुसरे मार्गदर्शक, शाहजहाँपूर येथील 'बाबुजी' म्हणून ओळखले जाणारे श्री राम चंद्र, यांच्या 121व्या जयंतीच्या व्हर्चुअल स्मरणोत्सवामध्ये शंभराहून अधिक देशातील दीड लाख अभ्यासी भाग घेणार आहेत.
29 एप्रिल 2020 : हार्टफुलनेसचा उगम प्राचीन भारताच्या योगशास्त्रातून झाला आहे, पण त्याचबरोबर ती आजच्या वैश्विक आधुनिक जीवनशैलीशी अनुकूल घडवलेली आहे. ध्यानपद्धतींच्या या प्रवाही संचात विज्ञान आणि अध्यात्म दोन्हींमधील उत्तम गोष्टी घेतल्या गेल्या आहेत, ज्यामुळे जगातील हजारो लोकांना अधिकउत्क्रांत जीवन जगण्यास मदत होत आहे.
हार्टफुलनेस मोहीमेचा उगम कुठे झाला? 1945 साली शाहजहाँपूरच्या श्री राम चंद्रांनी पहिली हार्टफुलनेस संस्था स्थापित केली आणि त्यांच्या गुरूंच्या नावावरून संस्थेला श्री राम चंद्र मिशन असे नाव दिले. 2020 हे श्री राम चंद्र मिशनचे अमृतमहोत्सवी वर्ष (75वे) असल्याने विशेष महत्त्वाचे आहे.
उत्तर भारतातील राज्य उत्तर प्रदेश येथील शाहजहाँपूर या शहरात 30 एप्रिल, 1899 रोजी श्री राम चंद्र यांचा जन्म झाला. ते सर्वांना 'बाबूजी' म्हणून परिचित होते.
येणार्या काही दिवसात, 29 आणि 30 एप्रिल आणि 1 मे रोजी होणार्या या व्हर्चुअल स्मरणोत्सवात बाबूजींची 121वी जयंती साजरी करण्यासाठी 100 देशातील दीड लाखाहून अधिक हार्टफुलनेस अभ्यासी सामुहिक ध्यान करण्याकरिता एकत्र येतील. या भव्य ऑनलाईन ध्यानसत्रांतील तीन दिवसांच्या दरम्यान सहा ध्यानसत्रे होतील व सर्व हृदये प्रेम आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरून जातील. कार्यक्रमाचे प्रसारण खाली दिलेल्या संकेतस्थळी सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता तिन्ही दिवस पाहता येईल :
या प्रसंगाबद्दल बोलताना 'दाजी' म्हणून सर्वांना परिचित असणारे हार्टफुलनेसचे वर्तमान मार्गदर्शक श्री कमलेश पटेल म्हणाले, “आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचे सार बाबुजींनी सर्वांना समजेल अशा साध्या पद्धतीत उतरवले आहे - दुसर्या शब्दात सांगायचे तर त्यांनी योगपद्धतीतील रहस्ये आधुनिक मानवजातीला उलगडून दाखवली आहेत. ज्याप्रमाणे आईनस्टाईने आपल्यासाठी भौतिकशास्त्र पुनःपरिभाषित केले, त्याचप्रमाणे बाबुजींनी आपली योगशास्त्राची समज पुन:परिभाषित केली आहे. आपले सर्व शोध बाबुजींनी 1940च्या काळात अभूतपूर्व पुस्तक मालिकेत लिहून ठेवले आहेत. त्यांच्या दिव्य शालीनतेने आणि साधेपणाने त्यांनी जगभरातील लोकांचे प्रेम आणि लक्ष या रूपांतरण करणार्या हार्टफुलनेस साधनापद्धतींकडे वेधून घेतले.
दाजी पुढे म्हणाले, “भविष्यात हजारो वर्षांपर्यंत बाबूजींचा आध्यात्मिक वारसा स्मरणात राहील, साधकांना आध्यत्मिक प्रगती करण्यास मदत करण्याचे त्यांचे सामर्थ्य अद्भुत आहे. जरी घरात बसूनच करावे लागले तरी बाबूजींची जयंती सामुहिक ध्यान करून आपण साजरी करू शकतो हे आपले परम भाग्य आहे.”
लहान वयापासूनच इतर कुठल्याही आवडी-निवडींपेक्षा बाबुजींनी आध्यात्मिक प्राप्तीचा ध्यास घेतला होता. प्रौढावस्थेत त्यांनी गृहस्थाश्रम पत्करला; शाहजहाँपूरच्या जिल्हा न्यायालयात त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ लिपिक म्हणून काम केले. जून 1922 साली, वयाच्या 22व्या वर्षी, ते फतेहगढच्या श्री राम चंद्रांना भेटले, ज्यांना त्यांनी आपले मार्गदर्शक म्हणून स्वीकारले. त्या वेळेपासून त्यांनी आपले भौतिक जीवन चालू ठेवत स्वत:ला पूर्णपणे हार्टफुलनेस साधनेला वाहून घेतले आणि आध्यात्मिक प्रगतीची एक खास शैली विकसित केली, जिचे आज हजारो अनुयायी आहेत. आपले सौभाग्य आहे की त्यांनी आपला आध्यात्मिक प्रवास अनेक पत्रे, डायर्या आणि पुस्तकांमधून नोंदवून ठेवला आहे.
लालाजींच्या निधनानंतर, 1940 च्या दशकापुढे, बाबुजींनी हार्टफुलनेस पद्धत भारताच्या कानाकोपर्यापर्यंत पोहचवली आणि 1970पासून त्यांनी युरोप, उत्तर अमेरिका, साउथईस्ट आशिया आणि आफ्रिका देशांचा दौरा करून ही आंतरिक रूपांतरणाची साधी, शास्त्रोक्त पद्धत लोकप्रिय केली. इतक्या साध्यासुध्या सुरुवातीपासून ही पद्धत आता लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारी एक विश्वव्यापी हार्टफुलनेस चळवळ झालेली आहे.
Comments
Post a Comment