‘रिइमॅजिन बिझनेस, रिइमॅजिन द वर्ल्ड’
‘रिइमॅजिन बिझनेस, रिइमॅजिन द वर्ल्ड’ कोरोनानंतरच्या जगाचा आणि उद्योगविश्वाचा अंदाज देण्यासाठी, देशातील विविध मान्यवर उद्योजक आज वेबिनारमध्ये (webinar) एकत्र येत आहेत.
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील उद्योगजगतावर दुरगामी परिणाम होत आहे. त्यामुळे कोरोनानंतरच्या जगाचा आणि उद्योगविश्वाचा अंदाज देण्यासाठी, देशातील विविध मान्यवर उद्योजक आज वेबिनारमध्ये (webinar) एकत्र येत आहेत. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या ‘इटी एज्’ या प्लॅटफॉर्मवर 29 एप्रिल रोजी दुपारी 2.30 ते संध्याकाळी 7.30 वाजेतो ‘रिइमॅजिन बिझनेस, रिइमॅजिन द वर्ल्ड’ या विशेष वेबिनारचे (webinar) आयोजन करण्यात आले आहे.
कोविड 19मुळे जगभरात संभाव्य आर्थिकमंदीवर मात करण्यासाठी विविध कंपन्यांचे सीईओ नेमके काय उपाययोजना करणार आहेत यावर प्रामुख्याने या वेबिनारमध्ये (webinar) चर्चा होणार असून, कोरोनानंतरच्या उद्योगजगताचा प्रवास कसा असला पाहिजे यावरही त्यामध्ये प्रकाश टाकण्यात येणार आहे. भारतातील उद्योजक सरकारच्या मदतीने या मंदीवर कशाप्रकारे मात केली पाहिजे याबद्दलही महत्वपूर्ण चर्चा यावेळी होणार आहे.
कोण असणार आहेत webinar मध्ये ?
या वेबिनारमध्ये इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांच्यासोबत इकॉनॉमिक्स टाइम्स (दक्षिण) संपादिका अर्चना राय या वार्तालाप करतील. तर हिंदुजा उद्योगसमूहाचे सहध्यक्ष जी पी हिंदुजा आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा हेदेखील आपली मते मांडणार आहेत. त्याचवेळी मॅककॅन जागतिक उद्योग समूहाचे प्रमुख आणि सीईओ हॅरिश डायमंड व समूहाचे भारतीय सीईओ प्रसून जोशी हे माध्यमांसदर्भात विषय मांडतील. बांधकाम व्यवसायाबद्दल इमार ग्रुपचे चेअरमन मोहम्मद अल्बार तर स्टार्टअप उद्योजकांपुढील आव्हानांबद्दल सिक्वेया कॅपिटलचे व्यवस्थापकिय संचालक राजन आनंदन चर्चा करतील. तर ओयो रुम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल हे कोविड 19 नंतरच्या उद्योगजगताचे नवे नियम काय असू शकतील यावर प्रकाश टाकणार आहेत.
Comments
Post a Comment