नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे नॉन-कोविड आणि कोविड रुग्णांमधील स्ट्रोकवरील सर्वात मोठा तुलनात्मक वैद्यकीय अभ्यासाचा निष्कर्ष जाहीर

 

मुंबई28 ऑक्टोबर, 2020: जागतिक पक्षाघात (स्ट्रोक) दिवसाचे औचित्य साधूननानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने कोविड नसलेल्या आणि कोविड असलेल्या रुग्णांमधील स्ट्रोकबाबत न्यूरोलॉजिकल डेफिसीट (मज्जातंतूविषयक वैगुण्य)विकृतीमृत्युदर आणि एकंदर वैद्यकीय परिणाम या संदर्भातील सर्वात मोठा तुलनात्मक वैद्यकीय अभ्यासाचा निष्कर्ष जाहीर केला. कोविड  रुग्णांमधील पक्षाघाताचे प्रमाण हे केवळ 1.5% असूनही त्यांचा बरा होण्याचाकार्यात्मक परिणामाचा आणि मृत्यूचा दर हा कोविड नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत अतिशय वाईट असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून समोर आला आहे.      

‘स्ट्रोक इन पॅन्डामिक’ या अभ्यासाचा एक भाग म्हणून 1 मे ते 31 ऑगस्ट या काळात पक्षाघाताच्या 42 रुग्णांवर केलेल्या उपचारांचे विश्लेषण करण्यात आले. सुयोग्य वैद्यकीय निष्कर्ष काढता यावेत यासाठी रुग्णांची कोविड पातळीवयरुग्णांमधील अन्य रोगांची परिस्थिती (व्याधीची)  यानुसार त्यांचे दोन समान गट करण्यात आले. 

 

या अभ्यासानुसार, अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासांच्या तुलनेत एकूण कोविड रुग्णांपैकी 1.4% रुग्णांना पक्षाघाताचा झटका आला. यावरून याचा परिणाम 5% ते 6% असल्याचे निष्पन्न होते. परंतुऔषधोपचार केल्यानंतर जे कार्यात्मक परिणाम दिसून आले त्यात कोविड  रुग्णांमधील बोलण्यातील अस्खलितपणाहाता-पायांच्या हालचाली आणि आकलनविषयक क्षमता ही अतिशय खराब असल्याचे दिसून आले. कोविड नसलेल्या ज्या रुग्णांना पक्षाघाताचा झटका आला त्यांच्यात कमी वेळात न्यूरोलॉजिकल आणि शारीरिक सुधारणा दिसून आली तसेच त्यांच्यात इतर काही गुंतागुंतीची परिस्थितीही उद्भवली नाही.

तज्ञांना दोन्ही गटांमध्ये कोणत्याही प्रकारचे रेडिओलॉजिकल फरक आढळून आले नसले तरी, ‘स्ट्रोक इन कोविड’ गटात डी-डीमर या रक्त गोठण्याच्या जीवशास्त्रीय मार्करची (सूचकाची) पातळी जास्त असल्याचे आढळून आले. 

 

नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आणि न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख तसेच या अभ्यासाचे मुख्य लेखक डॉ. प्रद्युम्न ओक यांनी या दोन गटांमधील फरक सांगताना लवकरात लवकर उपचार मिळविण्याचा काळ गमावणे (गोल्डन अवर) आणि संसर्ग प्रेरित प्रणालीचा सहभाग या गोष्टींना जबाबदार ठरवले. 

 

डॉ. ओक म्हणाले, “महासाथीच्या परिस्थितीमध्ये पक्षाघातावर इलाज करण्यासाठी लवकरात लवकर निदान आणि अति दक्षता अतिशय महत्त्वाची असल्याचे या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. डी-डीमर पातळीतील वाढ आणि पक्षाघाताची शक्यता यांच्यातील संबंध समजून घेतल्यास कोविड रुग्णांमधील पक्षाघात नियंत्रणात ठेवता येऊ शकेल या शक्यतेला बळकटी मिळते.” 

 

डॉ. प्रियांका प्रभू आणि डॉ. आदित्य रहेजा यांनी सह-लेखक म्हणून केलेल्या या अभ्यासाची प्रतिकृती शहरातील इतर मुख्य पक्षाघात युनिट्समध्ये राबविण्यात येणार आहे. डॉ. ओक पुढे म्हणाले, “आम्ही केलेल्या अभ्यासाची प्रतिकृती इतरत्र राबविण्यासाठी आणि जास्तीत जास्त रुग्णांवर याचा वापर करून आमचे निष्कर्ष सिध्द करण्यासाठी आम्ही शहरातील महत्त्वाच्या सार्वजनिक आणि खासगी रूग्णालयांच्या संपर्कात आहोत. कोविड -19 विषयी आणि त्याच्या बहुविध परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच पक्षाघातासंबंधी जागरूकता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही वैद्यकीय क्षेत्रासाठी प्राथमिक गरज झाली आहे.”

 

मुंबईतील पहिली पक्षाघात हेल्पलाईन:

जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने 24 तास सुरू असणारी आगळी वेगळी ‘स्ट्रोक हेल्पलाईन’ सुरू केली. हेल्पलाईन ‘8405050548’ वर प्रशिक्षित न्यूरोलॉजीस्ट उपलब्ध असतील आणि ते पक्षाघाताची लक्षणे, शोध आणि उपचार यासंबंधीच्या लोकांच्या सर्व शंकांचे निरसन करतील. ‘गोल्डन अवर’ अर्थात महत्त्वाच्या वेळातील उपचार दर सुधारणे आणि पक्षाघातामुळे उद्भवणारी विकृती तसेच मृत्यूदर कमी करणे हे या हेल्पलाईनचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

 

आकडेवारी:

कोविड आणि नॉन कोविड रुग्णांमधील विविध घटकांची तुलना

 

घटक

गट

दर

वय (वर्षे)

कोविड

57.29

 

नॉन-कोविड

60.95

इतर रोगांची (व्याधी) संख्या  ^

कोविड

1.86

 

नॉन-कोविड

2.05

प्लेटलेट्स (पेशी) संख्या

कोविड

239423.81

 

नॉन-कोविड

300123.81

डी-डीमर  (एनजी/मिली) ^

कोविड

20301.08

 

नॉन-कोविड

1553.68

परिणामांपर्यंतचे रुग्णप्रवेश दिवस ^

कोविड

13.10

 

नॉन-कोविड

9.67

सुधारित श्रेणी संख्या #

कोविड

2.90

 

नॉन-कोविड

1.81

 

परिणामांपर्यंतचे रुग्णप्रवेश दिवस  

 

परिणामांपर्यंतचे रुग्णप्रवेश दिवस  

 

गट

एकूण

 

 

कोविड

नॉन-कोविड

 

< 5 ^

संख्या

3

8

11

 

%

14.3%

38.1%

26.2%

5 to 9 ^

      संख्या

5

7

12

 

%

23.8%

33.3%

28.6%

10 to 14 #

संख्या

8

1

9

 

%

38.1%

4.8%

21.4%

15 & > #

संख्या

5

5

10

 

%

23.8%

23.8%

23.8%

एकूण

संख्या

21

21

42

 

%

100.0%

100.0%

100.0%


गोल्डन पिरीयड दरम्यान

गोल्डन पिरीयड दरम्यान

 

गट

एकूण

 

 

कोविड

नॉन-कोविड

 

हो

संख्या

0

6

6

 

%

0.0%

28.6%

14.3%

नाही

    संख्या

21

15

36

 

%

100.0%

71.4%

85.7%

एकूण

   संख्या

21

21

42

 

%

100.0%

100.0%

100.0%

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight