अक्का आणणार देवाच्या आयुष्यात आणखी एक डॉली??


रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. देवा भाईची हटके स्टाईल, त्याची भन्नाट गॅंग, डॉलीबाई आणि त्याची जुगलबंदी आणि मुलीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन त्या कॉलेजमध्ये देवा भाईने केलेला दंगा प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिकेतील देवा आणि डॉक्टर मोनिका ही पात्रं तर त्यांच्या मनात घरकरून बसली आहेत. सोशल मीडियाद्वारे देखील या कलाकारांवर प्रेक्षक आणि चाहते प्रेमाचा वर्षाव करतात.
सध्या मालिकेतील देवा आणि डॉ मोनिका यांचा लव्हट्रॅक चांगलाच पसंत केला जातोय हे समजेल. आता दोन व्यक्तिंमधलं प्रेम म्हंटलं की त्यात उतार चढाव आलेच, रुसवे फुगवेही आले शिवाय आपल्याच लोकांची नाराजी किंवा त्यांचे हेवेदावेही आलेच. डॉक्टर डॉन मध्ये सध्या याच प्रेमाची परिक्षा पाहिली जातेय. देवाच्या प्रेमाला अक्काचा साफ विरोध आहे हे प्रेक्षकांनी पाहिलंच आहे. पण अक्का आता देवाच्या आयुष्यात अजून एक डॉली घेऊन येणार आहे आणि हि डॉली दुसरी तिसरी कोणी नसून एक म्हैस आहे जी अक्का डॉलीच्या घरासमोर बांधते. आता डॉलीबाई या नवीन डॉलीला बघून काय प्रतिक्रिया देणार आणि देवा या नवीन डॉलीचा स्वीकार करणार का? अक्का आणि मोनिकाच्या भांडणांमध्ये देवाची काय अवस्था होणार? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO