अभिनेता रोशन विचारे तुझं माझं जमतंय या मालिकेत साकारणार प्रोफेसरची भूमिका

झी युवावरील 'तुझं माझं जमतंय' या आगामी मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्कंठा शिघेला नेली असून या मालिकेत नक्की काय धमाका असणार आहे ते पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पम्मी म्हणून टीव्हीवर पुनरागमन करतेय आणि तिच्या सोबत अभिनेता रोशन विचारे आणि अभिनेत्री आसावरी भरती भानुदास हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता रोशन विचारे या आधी एका पौराणिक मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता आणि आता तुझं माझं जमतंय या मालिकेत तो मानसशास्त्र या विषयाच्या प्राध्यापकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्या या नव्या भूमिकेबद्दल बोलताना रोशन म्हणाला, "प्रेक्षकांनी मला पौराणिक व्यक्तिरेखा साकारताना पाहिलं आहेआता मला एका सध्या वेशात आणि सध्या मुलाची भूमिका साकारताना प्रेक्षक पाहू शकतील. तुझं माझं जमतंय या मालिकेत मी माझ्या वयाच्या आसपासची भूमिका साकारतोय याचा मला खूप आनंद होतोय. या मालिकेत मी शुभंकर नगरकर नावाच्या एका मानसशास्त्र या विषयाच्या प्राध्यापकाची व्यक्तिरेखा निभावणार आहे जो महिला विद्यालयात शिकवतो. शुभंकरला फोटोग्राफीची सुद्धा आवड आहे. शुभंकर याचं लग्न अश्विनीशी होतं पण पम्मी त्या दोघांच्या वैवाहिक जीवनात काय तडका लावणार आहे हे प्रेक्षकांना या मालिकेतून पाहायला मिळेल. माझी झी युवा या वाहिनीसोबत ही दुसरी मालिका आहे आणि पुन्हा एकदा झी परिवाराशी मी जोडला गेलो आहे याचा मला आनंद आहे."  
हि मालिका ४ नोव्हेंबर पासून झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight