झी युवा वरील 'तुझं माझं जमतंय' या मालिकेतून मोनिका बागुल करणार छोट्या पडद्यावर पदार्पण

तुझं माझं जमतंय या झी युवा वरील आगामी मालिकेच्या प्रोमोजमुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेची बरीच चर्चा होतेय. या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पुनरागमन करतेय आणि यावेळी हि ती एकदा ठसकेदार 'पम्मी' या व्यक्तिरेखेसोबत प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे प्रेक्षक या मालिकेसाठी खूपच उत्सुक आहेत. अपूर्वा नेमळेकर सोबत या मालिकेत रोशन विचारे आणि मोनिका बागुल हे दोघे या मालिकेत प्रमुख भूमिका निभावताना दिसणार आहेत.
 मोनिका या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करतेय. तिच्या पदार्पणाविषयी आणि मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना मोनिका म्हणाली, "तुझं माझं जमतंय या मालिकेत मी अश्विनी नवले हि व्यक्तिरेखा साकारतेय. अश्विनी हि खूपच साधी, सरळ, हळवी आणि चुलबुली आहे. तिचं आयुष्य तिची आई, तिची बहीण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरातील टीव्ही याभोवती फिरतं. टीव्हीवर लागणाऱ्या मालिकांमध्ये जे घडतं तसंच खऱ्या आयुष्यात देखील घडतं असा अश्विनीचा समज आहे. टीव्ही हा अश्विनी आणि तिच्या आईच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. पदार्पणातच मला अशी भूमिका आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळतंय याचा मला आनंद आहे आणि प्रेक्षकांना अश्विनी नक्की आवडेल अशी मला खात्री आहे." 
तुझं माझं जमतंय हि मालिका ४ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO