टेलिव्हीजनवरील पहिला ऑनलाईन लग्नसोहाळा रंगणार शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये !

२१ नोव्हेंबर रात्री १०.०० वा. कलर्स मराठीवर

 

 

 

मुंबई १९ नोव्हेंबर २०२० : आपल्या संस्कृतीत जीवन म्हणजे अनंत उत्सवांनी नटलेला सोहळा आणि त्यामधील आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे “लग्न सोहळा”ही संकल्पना मुळातच भव्य, आनंददायी... वधू – वर बघण्यापासून ते थेट वधूची पाठवणी होईपर्यंतचा हा थाटामाटात पार पडणारा सोहळा सगळ्यांच्याच आयुष्यातील अविभाज्य भाग.... त्यात लगीनघाई म्हणजे आपल्याकडे जिव्हाळ्याचा विषय... पण, सद्यस्थिति लक्षात घेता तरुण पिढी काय तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील डिजिटलचे महत्व काही औरच होऊनं बसले आहे ! आतापर्यंत एका व्हिडिओ कॉलवर सार्‍या भेटीगाठी पार पडत, मन जुळत, मैत्री होत असे... पण, आता मात्र ऑनलाईन लग्नाच्या गाठी जुळणार आहेत... शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये अखेर शंतनू आणि शर्वरीचा लग्नसोहाळा पार पडणार आहे... एकीकडे वर्‍हाड, नवरा मुलगा एका बेटावर, नवरी मुलगी दुसर्‍याच बेटावर आणि लग्न घडवून आणणारे भटजी तिसर्‍याच स्वतंत्र बेटावर... शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी झाल्या, बोलण सुरू झालं आणि या दोघांचे हे नातं ऑनलाईनच जुळल... काही विघ्न आली पण शर्वरीच्या साथीने हे दोघे त्यातून बाहेर पडले....  आणि आता रंगणार आहे टेलिव्हीजनवरील पहिला ऑनलाईन लग्नसोहळा लॉकडाउन दरम्यानचा ऑनलाईन लग्नसोहळा शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये २१ नोव्हेंबर रात्री १०.०० वा आपल्या कलर्स मराठीवर. शंतनू आणि शर्वरीचा हा ऑनलाईन लग्न सोहळा कसा पार पडेल ? काय गंमती जमती होतील ? हे बघण्यासाठी तुम्ही देखील सहभागी व्हा या न्यू नॉर्मल, आगळया वेगळ्या लग्नसोहळयामध्ये...

 

एकदा का एका माणसावर जीव जडला की मग कितीही अडथळे, संकटे मार्गात येवोत माणूस त्यामधून मार्ग काढतोच... मग ते ऑनलाईन भेट ते थेट लग्न का असेना... तसं पाहिलं तर, तंत्रज्ञान आणि लग्न हे दोन काहीही संबंध नसलेले विषय एकत्र बांधले गेले आहेत आणि लग्नाची रंगत वाढत चालली आहे. असंच शंतनू – शर्वरीच्या या प्रवासात घडलं... लग्नानंतरचा शंतनू आणि शर्वरीचा प्रवास कसा असेल याचे तुम्ही नक्की साक्षीदार व्हा ... कारण हा प्रवास अनुभवणं नक्कीच खूप गोड आणि मजेशीर असणार आहे... शंतनू आणि शर्वच्या लग्नसोहळ्यास नक्की यायच हा ! २१ नोव्हेंबर रात्री १०.०० वा आपल्या कलर्स मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight