केजे सोमैया हॉस्पिटल आणि जेलनोव्हा लॅब्जने कोविड-१९ च्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी केली टर्मजेल लॉझेन्ज गोळ्यांची चाचणी

~ कोविड-१९ च्या संसर्गाचा धोका कमी करण्यामध्ये टर्मजेल (TURMGEL)च्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी संशोधन ~

मुंबई, नोव्हेंबर २०२०कोविड-१९ च्या संसर्गाचा धोका कमी करण्याच्या कामी टर्मजेलच्या उपयुक्ततेचा अभ्यास करण्यासाठी ३०३ आरोग्यकर्मींच्या सोबतीने महिनाभर चालणारे संशोधन हाती घेत आरोग्यकर्मींमध्ये कोविड-१९ च्या संसर्गाचा धोका कमी करण्याच्या कामी केजे सोमैया हॉस्पिटल आणि जेलनोव्हा लॅब्जने एक नवे पाऊल उचलले आहे.

टर्मजेल हे ग्लोबल पेटंट असलेले एकमेव लॉझेन्ज (तोंडात विरघळणारी विशिष्ट आकाराची गोळी) बाजारात उपलब्ध आहे. हे लॉझेन्ज अॅमेझॉनवर, जेलनोव्हा लॅब्जच्या वेबसाइटवर तसेच निवडक दुकानांमध्ये १० गोळ्यांसाठी १७० रुपये इतक्या माफक किंमतीत उपलब्ध आहे. ते जगभरातील अनेक देशांतही निर्यात केले जात आहे. टर्मजेलचे शुगर-फ्री फॉर्म्युलेशन उदरमार्ग टाळते. या गोळीतून शरीराला मिळणारे जैविकदृष्ट्या अत्यंत सक्रिय संयुग लाळेतील विषाणूसंसर्गास अटकाव करते व परिमाणी रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

कोविड-१९ साठी कारणीभूत असलेला कोरोनाव्हायरस (सार्स-कोव्‍ह-२) हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे जो प्रामुख्याने नाक आणि तोंडावाटे शरीरात प्रवेश करतो तेव्हा काही काळासाठी तोंडातील लाळेमध्ये त्याचा मुक्काम असतो. या काळामध्ये बहुतेकवेळा रुग्णांना आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होण्याची भीती असते.

आरोग्यकर्मींना रुग्णांवर उपचार करताना या आजाराची लागण होण्याचा मोठा धोका असतो, कारण रुग्णांच्या खोकण्या-शिंकण्यासारख्या कृतींतून उडणारे थेंब आणि सूक्ष्म तुषार यांच्यामधून हा विषाणू आरोग्यकर्मींच्या शरीरात शिरकाव करू शकतो. मास्क आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरूनही या मंडळींना संसर्गाचा धोका खूप जास्त असतो. जगभरात १० टक्क्यांहून अधिक आरोग्यकर्मींना रुग्णांवर उपचार करताना या संसर्गाची लागण झालेली आहे. म्हणूनच या अभ्यासामध्ये सोमैया हॉस्पिटलने टर्मजेल लॉझेन्जेसचा वापर करण्याचे ठरविले, कारण या गोळ्या लाळेत विरघळतात आणि थेट रक्तप्रवाहापर्यंत पोहोचतात.

टर्मजेल घेतल्यामुळे कोविड-१९ च्या संसर्गाचा धोका कमी होता का हे पाहण्यासाठी डॉ. निहारिका गिल आणि डॉ. प्रणोती मेस्त्री यांनी कोविड-१९ वॉर्डांमध्ये काम करणा-या आरोग्यकर्मींमध्ये ही पाहणी केली. सर्व आरोग्यकर्मींना दिवसातून तीन वेळा टर्मजेल लोझेन्ज गोळ्या देण्यात आल्या. पाहणीत सहभागी झालेल्या आरोग्यकर्मींकडून इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने सुरक्षितता आणि संसर्ग नियंत्रणासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले व केजे सोमैया मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या इन्स्टिट्यूशनल एथिक्स कमिटीकडून या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. टर्मजेलचा आरोग्यकर्मींनी चांगल्या प्रकारे स्वीकार केला व पुढील संशोधनावर काम सुरू आहे.

के.जे. सोमैया मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राच्या डीन डॉ. वर्षा फडके म्हणाल्या, ‘’आपण एका जागतिक आरोग्यसमस्येचा सामना करत आहोत आणि एक निरोगी समाज घडविण्यासाठी आपल्याजवळील सर्वोत्तम गोष्टींचे योगदान देणे ही आपली जबाबदारी आहे. केजे सोमैया हॉस्पिटलमध्ये आम्ही नेहमीच एक अधिक चांगला व निरोगी समाज घडविण्याच्या दिशेने काम करण्याच्या तत्त्वावर विश्वास ठेवला आहे. जेलनोव्हा लॅब्जच्या पाठबळाने घेण्यात आलेली टर्मजेल पाहणी हा सुद्धा विषाणूशी लढा देण्याच्या व लोकांसाठी एक अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. या विषयाचे अधिक सखोल संशोधन करताना आम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील व त्याचा लाभ समाजाला मिळेल, अशी आमची आशा आहे.’’

जेलनोव्हा लॅबॉरेटरीज (आय) प्रा. लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. जतीन ठक्कर म्हणाले, ‘’आपल्या कोविड योद्ध्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करून पाहणे अनिवार्य आहे. कोविड-१९ च्या रुग्णांवरील उपचारामध्ये हळदयुक्त लॉझेन्ज गोळ्यांच्या उपयुक्ततेचा अभ्यास करण्यासाठी अधिक संशोधनाची आखणी करण्यात आली आहे. सोमैया हॉस्पिटलच्या योगदानाच्या मदतीने हे संशोधन यशस्वी होण्याची आम्हाला प्रतिक्षा आहे.‘’

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight