भारतपे ने सर्वात मोठ्या प्रमाणावर विस्तारित योजनांची घोषणा केली: डिसेंबर २०२० पर्यंत ६५ शहरांमध्ये विस्ताराचे उद्दिष्ट

भारतातील सर्वात मोठी व्यापारी पेमेंट कंपनी भारतपे यांनी आज देशातील टायर १ , २ आणि ३ शहरांमध्ये आक्रमक विस्तार योजनांची घोषणा केली. सध्या ३५ पेक्षा अधिक शहरांमध्ये असलेल्या या कंपनीने डिसेंबर २०२० पर्यंत आणखी ३० शहरे आपल्या यादीत समाविष्ट करून आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढवण्याची योजना आखली आहे. संपूर्ण भारतभर पसरलेल्या शहरांमध्ये कोलकाता आणि चेन्नईसारखी टायर १ शहरे, कोयंबटूर, कोची, देहरादून, नागपूर, भुवनेश्वर, पटना यासारख्या उदयोन्मुख शहरे तसेच अमृतसर, वाराणसी, आग्रा, अलाहाबाद यासारख्या पर्यटन केंद्रांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २१ च्या अखेरपर्यंत कंपनीच्या विद्यमान ५ दशलक्ष व्यापार्‍यांच्या यादीत आणखी ३  दशलक्ष व्यापारी जोडण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
ही घोषणा भारतातील ६० दशलक्ष एसएमई (लघु व मध्यम उद्योग) साठी प्राधान्यकृत वित्तीय सेवा भागीदार होण्यासाठी कंपनीच्या बांधिलकीच्या अनुषंगाने आहे. कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या शून्य भाडे, शून्य फी कार्ड कार्ड स्वीकृती मशीन (भारतस्वाइप) सह नवीन शहरांमध्ये शून्य व्यवहार शुल्कासह इंटरऑपरेबल यूपीआय क्यूआर आणणार आहे. या व्यतिरिक्त, व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यात मदत करण्याच्या उद्देशाने भारतपे प्रतिस्पर्धी व्याज दरावर ७ लाख रुपयांपर्यंतचे आकर्षक संपार्श्विक मुक्त (कोलॅटरल फ्री) कर्ज देणार आहे.
भारतपे आपले हायब्रीड परतफेड मॉडेल ऑफर करेल ज्यामध्ये दररोजच्या क्यूआर / पीओएस संकलनाचे संयोजन असेल आणि कर्जाचा लाभ घेणार्‍या व्यापाऱ्यांना थेट बँक खात्यातून साप्ताहिक देयके दिली जातील.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight