डॉक्टर डॉनची भन्नाट गॅंग करतेय ट्रेंड फॉलो


लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. देवा भाईची हटके स्टाईल, त्याची भन्नाट गॅंग, डॉलीबाई आणि त्याची जुगलबंदी आणि मुलीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन त्या कॉलेजमध्ये देवा भाईने केलेला दंगा प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिकेतील देवा आणि डॉक्टर मोनिका ही पात्रं तर त्यांच्या मनात घरकरून बसली आहेत. सोशल मीडियाद्वारे देखील या कलाकारांवर प्रेक्षक आणि चाहते प्रेमाचा वर्षाव करतात.
डॉक्टर डॉनच्या सेटवर ऑफस्क्रीन देखील कलाकार तितकीच धमाल करत असतात. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड्स पाहायला मिळतात. त्यातच सध्या चालू असलेला ट्रेंड म्हणजे तन्नू वेड्स मन्नू चित्रपटातील 'साड्डी गली' या गाण्यावर नेटिझन्स करत असलेला धमाल डान्स. मग यात डॉक्टर डॉनचे कलाकार कसे मागे राहतील. म्हणून अनुराग वरळीकरने देवा, अजिंक्य आणि त्याचा या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ खूपच रंजक असून त्यावर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

BlueStone Jewellery & Lifestyle IPO