'नेरोलॅक कलर माय स्पेस' ॲपसह आता सुलभपणे घर सुशोभित करा
मुंबई, १८ नोव्हेंबर २०२०: देशातील आघाडीच्या पेंट ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या कन्साई नेरोलॅक पेंट्स लि.ने त्यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त ग्राहक मोबाइल अॅप 'नेरोलॅक कलर माय स्पेस' सादर केले आहे. हे अॅप घरमालकांसाठी त्यांच्या पेंटिंगसंदर्भात सर्व गरजांची पूर्तता करण्याकरिता एक-थांबा व्यासपीठ आहे. हे ॲप इंग्रजी आणि नऊ इतर भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि ग्राहकांना विविध रंगछटा शोधण्याचा त्रासमुक्त व आनंददायी अनुभव देते. नेरोलॅक कलर माय स्पेस ॲप गुगल प्ले स्टोअर आणि अँड्रॉइड ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे.
या ॲपसह कन्साई नेरोलॅक पेंट्सचा ग्राहकांना त्यांचे घर, कार्यालय किंवा इतर ठिकाणे वास्तविक रंगवण्यापूर्वी त्यांच्या आवडीचे रंग, टेक्स्चर्स, संयोजन व डिझाइन्समध्ये व्हर्च्युअली पाहण्याची संधी देण्याचा मनसुबा आहे. ग्राहक नेरोलॅकच्या व्यापक इंटीरिअर व एक्स्टीरिअर उत्पादनांमधून निवड करू शकतात.
याप्रसंगी बोलताना कन्साई नेरोलॅक पेंट्स लि.चे कार्यकारी संचालक श्री. अनुज जैन म्हणाले, ''आम्हाला नेरोलॅक कलर माय स्पेस ॲप सादर करण्याचा आनंद होत आहे. हे ॲप ९ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि या ॲपमध्ये आकर्षक कलर पिकर टूल, पेंट बजेट कॅलक्युलेटर, कलर व्हिज्युअलायझर आणि नेरोलॅकच्या उत्पादन ऑफरिंग्जची सविस्तर माहिती आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या घरांमधूनच आरामदशीरपणे पेंटसंदर्भात निर्णय घेण्यामध्ये मदत होते. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या ग्राहकांना हे ॲप आवडेल आणि ते या अनुभवाची प्रशंसा करतील.''
ॲपमधील 'कलर ॲण्ड टेक्सचर पॅलेट' टूल ग्राहकांना १५०० हून अधिक पर्यायांची रेंज देते आणि तुम्ही तुमचे स्वत:चे सानुकूल पॅलेट्स तयार करू शकता. अद्वितीय व वैविध्यपूर्ण 'कलर पिकर' टूल ग्राहकांना त्यांच्या घरातील भिंतीवर लावल्या जाणा-या रंगाबाबत व्हिज्युअलाइज करण्यामध्ये मदत करते. अॲपमधील प्रीव्ह्यूज फिचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या भिंतीचे फोटो क्लिक करू शकता आणि त्या भिंतीला १५०० हून अधिक रंगछटा व टेक्स्चर्सचे व्हिज्युअल रूप देऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला प्रभावीपणे योग्य रंगाची निवड करण्यामध्ये मदत होऊ शकते.
या ॲपमध्ये 'इन्स्पायरेशन' टूल देखील आहे, ज्यामध्ये विविध प्रकारचे व्हिडिओज, लेख, वॉल आर्ट कल्पना, ट्रेण्ड्स व प्रशंसापत्रे आहेत. ज्यामुळे ग्राहकांना प्रेरणांमधून निर्माण करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या रंगछटांमधून ब्राऊज करण्याची संधी मिळते.
ॲपमधील महत्त्वाचे टूल आहे 'पेंट बजेट कॅलक्युलेटर'. हे टूल ग्राहकांना त्यांच्या विशिष्ट पेंटिंग गरजांसाठी त्यांच्या पेंट आवश्यकतांचा अंदाज घेण्यामध्ये मदत करते. तसेच ॲपमधील 'डिलर ॲण्ड पेंटर लोकेटर' टूल ग्राहकांना त्यांच्या परिसरातील जवळचे पेंटर व डिलर शोधून काढण्यामध्ये मदत करते.
१०० वर्षांचा वारसा असलेली कन्साई नेरोलॅक पेंट्स लि. पेंट तंत्रज्ञानाच्या अनेक क्षेत्रांमध्ये ट्रेण्डसेटर व महत्त्वपूर्ण बेंचमार्क राहिली आहे. देशातील आघाडीचा पेंट ब्रॅण्ड असल्यामुळे नेरोलॅक कलर माय स्पेस ॲपला कन्साई नेरोलॅक पेंट्स लि.चा विश्वास व नाविन्यतेचे पाठबळ मिळाले आहे.
नेरोलॅक कलर माय स्पेस ॲप येथे डाऊनलोड करा:
Comments
Post a Comment