चित्रपटगृहात पुन्हा झळकणार 'नटसम्राट'

काही कलाकृती या कालातीत असतात. या कलाकृतींचा कितीही आस्वाद घेतला तरी रंजनाची भूक शमत नाही.  अशा कलाकृतींच्या यादीतील 'नटसम्राट' या लोकप्रिय चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे. मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा हा चित्रपट उद्या शुक्रवार २७ नोव्हेंबरपासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे.  

कोरोनामुळे गेले कित्येक महिने बंद असलेली चित्रपटगृहे अनलॉकअंतर्गत पुन्हा सुरु झाली आहेत. पुन्हा एकदा   चित्रपटांचे दिमाखदार पोस्टर चित्रपटगृहांबाहेर झळकताना दिसू लागले आहेत. हळूहळू का होईना प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहाकडे वळताहेत. अशावेळी या रसिकप्रिय चित्रपटांचे प्रदर्शन म्हणजे सिंगल स्क्रीन व मल्टिप्लेक्स यांना नवचैतन्य देण्याचा प्रयत्न ठरणार आहे.
खाली दिलेल्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट झळकणार आहे.  


image.png


Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight