डॉक्टर डॉन मध्ये रोहिणी हट्टंगडी यांचे पुनरागमन

झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणूनच सोशल मिडीयावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय. लॉकडाऊन नंतर या मालिकेतील आजी म्हणजेच रोहिणी हट्टंगडी यांची व्यक्तिरेखा बहुतांशी व्हिडिओकॉल द्वारे प्रेक्षकांना दिसत होती पण आता मालिकेत पुन्हा एकदा आजीची धमाकेदार एंट्री होणार आहे.
आजी हि नेहमीची देवा आणि मोनिकाच्या प्रेमाला खतपाणी घालायचा काम करत होती आणि तिच्या येण्यामुळे देवा आणि मोनिका यांची लव्हस्टोरी पुन्हा रुळावर येईल. तसंच कबीर आणि राधाच्या प्रेमाला सुद्धा आजीची साथ मिळणार आहे. आजीला मालिकेत पाहणं प्रेक्षक मिस करत होते त्यामुळे आता आजीच्या एंट्रीमुळे मालिकेत खूप ट्विस्ट्स येणार यात शंकाच नाही आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

BlueStone Jewellery & Lifestyle IPO