ॲडव्‍हर्टायझिंग स्‍टॅण्‍डर्डस् कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय)

एएससीआयकडून आयपीएल दरम्‍यान झळकणा-या मद्य ब्रॅण्‍डबाबतच्‍या जाहिरातींची कसून चौकशी 

मुंबई, नोव्‍हेंबर २०२०: ॲडव्‍हर्टायझिंग स्‍टॅण्‍डर्डस कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) गेल्‍या काही आठवड्यांपासून सध्‍या सुरू असलेल्‍या इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) दरम्‍यान सरोगेट जाहिरातींबाबत कसून चौकशी करत आहे. एएससीआयने तक्रारींसदर्भात त्‍वरित कारवाई करण्‍यासाठी त्‍यांच्‍या नियमित साप्‍ताहिक फीड्सऐवजी मद्य ब्रॅण्‍डच्‍या प्रमोशनासंदर्भातील जाहिरातींवर देखरेख ठेवण्‍यासाठी नियमित अपडेट्स ठेवले आहेत. मागील एका महिन्यामध्‍ये एएससीआय नैतिकतेचे उल्‍लंघन केल्‍याची शक्‍यता असलेल्‍या अशा आठ जाहिरातींविरोधात तक्रारी करण्‍यात आल्‍या आहेत. यामध्‍ये व्‍हीस्‍की, बीअर व व्‍हाइट लिक्‍वोर ब्रॅण्‍ड्सचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांसंदर्भात एएससीआयने जाहिराती प्रसारित होण्‍याच्‍या २४ ते ४८ तासांमध्‍ये जाहिरातदारांना लेखी पत्राद्वारे तक्रारींबाबत कळवले असून त्‍यांच्‍याकडून प्रतिक्रिया येण्‍याची वाट पाहत आहे.

निवडण्‍यात आलेल्‍या जाहिरातींमध्‍ये म्‍युझिक सिडी ते पॅकेज वॉटर, नॉन-अल्‍कोहेालिक पेये व मर्चंडायझिंग यांच्‍या विक्रीसंदर्भातील जाहिरातींचा समावेश आहे. एएससीआयच्‍या चौकशीमध्‍ये मद्यासाठी सरोगेट्स काय आहेत आणि अस्‍सल ब्रॅण्‍ड विस्‍तारीकरणांमध्‍ये कोणत्‍या घटकांचा समावेश आहे याची तपासणी केली जात आहे.

अस्‍सल ब्रॅण्‍ड विस्‍तारीकरणासाठी पात्र असलेल्‍या घटकांबाबत एएससीआयचे कोड्स व मार्गदर्शकतत्त्वे स्‍पष्‍ट आहेत:

·         उत्‍पादनाचे (मद्य, तंबाखू इत्‍यादी) ब्रॅण्‍ड विस्‍तारीकरण अस्‍सल मानण्‍यासाठी ते उत्‍पादन अन्‍न व औषध प्रशासन आणि भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण इत्‍यादी सारख्‍या योग्‍य सरकारी प्राधिकरणांतर्गत नोंदणीकृत असले पाहिजे.

·         इन-स्‍टोअर उपलब्‍धता किमान १० टक्‍के असली पाहिजे. हे प्रमाण विभागातील आघाडीच्‍या ब्रॅण्‍डचे असते, ज्‍याच्‍याशी उत्‍पादन स्‍पर्धा करते, किंवा विक्री उलाढाल प्रतिवर्ष ५ कोटी रूपयांपेक्षा अधिक अथवा उत्‍पादन वितरित केल्‍या जाणा-या प्रत्‍येक राज्‍यामध्‍ये प्रतिवर्ष १ कोटी रूपयापेक्षा अधिक असली पाहिजे.

·         अशा उलाढाल व वितरण माहितीसाठी स्‍वतंत्र संस्‍थेकडून वैध प्रमाणपत्र असले पाहिजे.

अशा ब्रॅण्‍ड विस्‍तारीकरणांसाठी असलेल्‍या जाहिरातीमध्‍ये कायद्यांतर्गत प्रतिबंधित असलेल्‍या गोष्‍टी किंवा बंदी घालण्‍यात आलेल्‍या उत्‍पादनांचा समावेश असू शकत नाही. या दोन्‍ही गोष्‍टी जाहिरातींमध्‍ये दाखवता येऊ शकत नाहीत किंवा जाहिरातींमध्‍ये दाखवता येऊ शकत नाहीत अशा उत्‍पादनांवर बंदी आहे.

कायद्यानुसार सीबीएफसी प्रमाणपत्र असेल तरच मद्य ब्रॅण्‍ड विस्‍तारीकरणांसाठी जाहिराती टीव्‍हीवर दाखवता येऊ शकतात. टेलिव्हिजनसाठी आयपीएल प्रसारकाने एएससीआयला पुष्‍टी दिली आहे की, सर्व जाहिरातींची सीबीएफसी क्‍लीअरन्‍ससंदर्भात चौकशी करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे या जाहिराती केबल टीव्‍ही व नेटवर्क कायद्याचे उल्‍लंघन करत नाहीत. ही बाब लक्षात घेत एएससीआयने ओटीटी, डिजिटल व प्रिंट मीडियावर झळकणा-या जाहिरातींविरोधात तक्रारी केल्‍या आहेत.

एएससीआयच्‍या महासचिव मनिषा कपूर म्‍हणाल्‍या, ''आयपीएल हे भारतातील सर्वात मोठे विपणन व्‍यासपीठ असल्‍यामुळे आम्‍ही अधिक काळजी घेत आहोत. आम्‍ही प्रिंट, ओटीटी, डिजिटल या मीडिया क्षेत्रामधील जाहिरातींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्‍हाला संभाव्‍य उल्‍लंघन दिसताच आम्‍ही जाहिरातदारांना सात दिवसांच्‍या आत त्‍यांचे उत्‍पादन किंवा सेवा अस्‍सल ब्रॅण्‍ड विस्‍तारीकरणांतर्गत येत असल्‍याचा दावा सादर करण्‍यास सांगतो. यामध्‍ये विक्री, वितरण व मार्केट शेअर डेटाचा समावेश आहे, जो स्‍वतंत्र संस्‍थेद्वारे प्रमाणित असले पाहिजे. जाहिरातींनी अस्‍सल विस्‍तारीकरणासाठी निकषाची पूर्तता केली तरच त्‍या सुरू ठेवण्‍यास परवानगी दिली जाते. जाहिरातदार दिलेल्‍या मुदतीमध्‍ये प्रतिक्रिया देण्‍यास अयशस्‍वी ठरला तर एएससीआयच्‍या स्‍वतंत्र ग्राहक तक्रार समितीकडे तक्रारीसंदर्भात कारवाई करण्‍याची जबाबदारी सोपवली जाते.'' 

एएससीआय जाहिरात उद्योगाची एक स्वयं-नियामक संस्था आहे, ज्यात त्यांचे सदस्यएजन्सीजाहिरातदारमीडिया हाऊसेस आणि इतर भागधारक आहेत. सर्व विपणन दाव्यांमधील प्रामाणिकपणाचे आणि नीतिमत्तेचे पालन करून जाहिरातींवर ग्राहकांचा विश्‍वास वाढविणे हे त्यांचे ध्येय आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO