उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड’तर्फे 6 गुंतवणुकदारांसह INR. 240.47 कोटींच्या प्रायव्हेट प्लेसमेंटची सुरुवात
मुंबई, 22 मार्च: वाराणसी येथे मुख्यालय असलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (“बँक”)ने अलीकडेच त्यांचा दिनांक 4 मार्च 2021 रोजीचा रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस ड्राफ्ट (“डीआरएचपी”) सिक्युरिटीज ऑफ एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”)सोबत फाईल केला. या माध्यमातून Rs. 750 कोटींच्या ताज्या इश्यूद्वारे Rs. 1,350 कोटींचा निधी उभारण्याचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (इनिशियल पब्लिक ऑफर / “ऑफर”) देण्यात आला आहे. त्यांचे प्रवर्तक, उत्कर्ष कोअरइनव्हेस्ट लिमिटेडद्वारे विक्री प्रस्ताव Rs. 600 कोटींपर्यंतचा आहे.
बँकेच्या वतीने दिनांक 10 फेब्रुवारी 2021 रोजीच्या गुंतवणूक करारात नमूद केले होते की, इक्विटी शेअरच्या प्रायव्हेट प्लेसमेंटच्या करण्यात आलेल्या घोषणेत Rs. 240.47 कोटी किंमतीच्या 89,061,647 इक्विटी शेअरचा समावेश होता; ज्याची किंमत प्रती इक्विटी शेअर Rs. 27 याप्रमाणे असणार आहे; यामध्ये ऑलम्पस एसीएफ पीटीई लिमिटेड 37,037,037 इक्विटी शेअर; 13,444,444 इक्विटी शेअर्सची जबाबदारी पार्टीसीपेशन्स मॉरीशिअस; 12,962,962 इक्विटी शेअर्स आविष्कार भारत फंडला आणि 8,539,068 इक्विटी शेअर्स प्रत्येकी ट्रायडोस सीकॅव्ह II- ट्रायडोस मायक्रो फायनान्स फंड, कायदेशीर मालकी ट्रायडोस फंड्स बी. व्ही. (ट्रायडोस फेअर शेअर फंड याच्या कायदेशीर मालक क्षमतेत) आणि ग्रोथ कॅटलिस्ट पार्टनर्स एलएलसी याप्रमाणे राहतील.
या व्यवहारात प्रायव्हेट प्लेसमेंट फेरीच्या आरंभाकरिता कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड वित्तीय सल्लागाराच्या भूमिकेत असेल.
त्याशिवाय, या प्रस्तावाच्या लीड मॅनेजर्ससह ही बँक Rs. 250 कोटींची प्री-आयपीओ प्लेसमेंटही घेऊ शकते. आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड या प्रस्तावाचे लीड मॅनेजर्स राहतील.
Comments
Post a Comment