सिम्फनी एअर कुलर्स
सिम्फनी एअर कुलर्समुळे यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हीही थिरकाल 'सिम्फनी का मोविकुल'च्या तालाव
मुंबई, 30 मार्च 2021: सिम्फनी लिमिटेड या भारताच्या जागतिक एअर- कुलिंग कंपनी आणि एअर-कुलर्सच्या जगातील सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने 'सिम्फनी का मोविकुल' ही नवी मोहीम सादर केली आहे. मोठ्या घरांसाठी आणि घराबाहेरील वापरासाठी तयार करण्यात आलेल्या त्यांच्या नव्या कुलर्सची व्यावसायिक रेंज सादर करण्यासाठी ही मोहिम सूरु करण्यात आली आहे. गुंतवून ठेवणाऱ्या जिंगलच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांशी जोडले जाण्याचा उद्देश या राष्ट्रीय पातळीवरील या टीव्हीसीमागे आहे. येत्या उन्हाळ्यासाठी अगदी सुयोग्य असलेले तांत्रिकदृष्ट्या आधुनिक अशा मोविकुल एअर कुलर्सची नवी रेंज या जाहिरातीत दाखवण्यात आली आहे.
विविध ठिकाणी, विविध कार्यक्रमांमध्ये असलेल्या अनेक व्यक्तिरेखा दिसतात अशी या जाहिरातीची सुरुवात आहे. ही सगळीच माणसं उन्हाळ्याने प्रचंड बेजार झाली आहेत. या अशा नकोशा वातावरणाचा सामना करण्यासाठी खास मोठ्या जागांच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेले सिम्फनीचे मोविकुल एअर कुलर्स येतात. जाहिरातीत पार्श्वसंगीत म्हणून 'जब भी जहां भी करना हो कुल, सिम्फनी का मोविकुल...' हे मजेशीर गीत सुरू होतं आणि हवेत आलेल्या या बदलामुळे सगळीच माणसं आनंदी, ताजीतवानी आणि उत्साही होऊन नाचू लागतात. ट्राइटन कम्युनिकेशन्सची संकल्पना आणि निर्मिती असलेली ही सर्वसमावेशक मोहीम टेलिव्हिजन, डिजिटल, रेडिओ, प्रेस आणि इतर माध्यमांमध्ये सादर केली जाईल. माइकी मॅकक्लेरी यांनी संगीतबद्ध केलेल्या या जिंगलमध्ये खास मोठ्या जागांसाठी तयार करण्यात आलेल्या या एअर कुलर्सबद्दलची जागरुकता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. श्रोत्यांच्या मनात कायमस्वरुपी स्थान मिळवणाऱ्या आणि ब्रँड एंगेजमेंटवर भर देणाऱ्या यातील आकर्षक शब्दांच्या माध्यमातून या कुलर्सचे फायदे सांगितले जाणार आहेत.
सिम्फनी मोविकुल एअर कुलर्सची रचना उच्च परफॉर्मन्स असलेल्या कुलिंगसाठी करण्यात आली आहे. यातील दमदार, कोणत्याही मोसमात सुयोग्य राहणारी बॉडी आणि सहज वाहून नेता येण्याची सोय यामुळे हे एअर कुलर्स आऊटडोअर लग्न किंवा कार्यक्रम, वर्कशॉप्स, रेस्तराँ, रीसॉर्ट्स, कॅफे, जीम्स, प्रार्थनास्थळे, वर्कशॉप्स, शाळा आणि इतर प्रकारच्या व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी योग्य ठरतात. मोठे निवासी व्हिला आणि मोकळ्या मैदानांसारख्या मोठ्या जागांमध्ये स्थिर आणि योग्य तापमान राखण्यासाठीसुद्धा हे कुलर्स योग्य आहेत. यातील अतुलनीय परफॉर्मन्ससह कमी वीजवापर हा सुद्धा एक फायदा आहे. एअर इंडिशनिंगच्या तुलनेत फक्त 7-10% वीज वापर यात होतो.
या जाहिरातीच्या उद्घाटनाप्रसंगी सिम्फनीच्या विक्री आणि विपणन विभागाचे अध्यक्ष श्री. राजेश मिश्रा म्हणाले, "सिम्फनीमध्ये आमचा विश्वास ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार उत्पादने देण्यावर आहे. सिम्फनीची एअर कुलर्सची मोविकुल रेंज ही अभूतपूर्व आहे. या एअर कुलर्समध्ये नव्या युगातील तंत्रज्ञान आहे. सौंदर्य आणि कार्यक्षमता यात कोणतीही तडजोड न करता घरात/घराबाहेरच्या मोठ्या जागांसाठी सहज वाहून नेता येणारे कुलिंग पर्याय हवे असलेल्या ग्राहकांसाठी हा योग्य पर्याय आहे. ग्राहकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि त्यांना ही रेंज वापरून
पाहण्याची प्रेरणा देणाऱ्या आकर्षक जिंगलसह ही नवी रेंज सादर करण्यासाठी आम्ही खूप उत्साही आहोत. आमच्या ग्राहकांवर अनेक वर्ष या मोहिमेचा अमल राहील, याची आम्हाला खात्री आहे."
या जिंगलचे संगीतकार माइकी मॅकक्लेरी म्हणाले, "90च्या दशकात जिंगल अॅड्स फार प्रसिद्ध होत्या. काही लोकप्रिय स्लोगन्स तर आपल्याला आजही आठवतात. त्या स्लोगनसोबत ग्राहकांना ते ब्रँडही आठवतात. सिम्फनी का मोविकुल जिंगल प्रेक्षकांच्या मनाची अशी तार छेडण्यासाठीच रचण्यात आले आहे. हे साधे मात्र लक्षवेधी संगीत बऱ्याच विचारविनिमयातून आलं आहे. लोकांना बराच काळ लक्षात राहील, असं काहीतरी आम्हाला हवं होतं. ही जाहिरात पाहून तुम्ही नक्कीच नॉस्टॅलजिक व्हाल."
या मोहिमेबद्दल टीम ट्राइटन कम्युनिकेशन्स म्हणाली, "सिम्फनीच्या टीमसोबत काम करणे आणि या आकर्षक मोहिमेचा भाग होणे फार आनंदादायी होते. या जाहिरातीतून सिम्फनीची 'रीफ्रेशिंग लाइव्ज' ही ब्रँड ओळख प्रस्थापित होते आणि त्यात उत्साह, ऊर्जा असा आणखी एक वेगळा आयाम मिळतो. वापराचे अनेक प्रकार आणि लोकांच्या मुडवर कुलिंगचा होणारा परिणाम हे सुद्धा यात दाखवण्यात आले आहे. सभोवतालचे वातावरण गार आणि आल्हाददायक झाले की काय बदल होतात हे माइकी यांची उत्तम संगीतरचना आणि उत्साह नृत्याचा वापर करून दाखवण्यात आले आहे."
जाहिरातीची लिंक: https://www.youtube.com/watch?
सहभागी एजन्सीज :
- क्रीएटीव्ह एजन्सी : ट्राइटन कम्युनिकेशन्स
- प्रोडक्शन हाऊस : कलेक्टिव्ह आर्ट प्रा. लि., दिग्दर्शक : कार्तिक रामनाथकर
- संगीतरचना : माइकी मॅकक्लेरी
- कम्युनिकेशन्स एजन्सी : परफेक्ट रीलेशन्स
- मीडिया एजन्सी : पुर्णिमा अॅडव्हर्टायझिंग
- डिजिटल एजन्सी : व्हाईट
Comments
Post a Comment