मुथूट्टु मिनि


मुथूट्टु मिनिचा नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर (एनसीडी) इश्यु खुला

प्रत्येक Rs.1,000 दर्शनी मूल्य असलेल्या सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड एनसीडींचा इश्यु.

या एनसीडी इश्युचा आधारभूत इश्यु आकार Rs.125 कोटी इतका आहे, अतरिक्त Rs.125 कोटींपर्यंत ओव्हरसबस्क्रिप्शन करण्याचा पर्याय खुला असून याचे एकूण मूल्य Rs. 250 कोटी असेल (14 वा एनसीडी इश्यु)

सिक्युअर्ड एनसीडी पोर्शन Rs.200 कोटीपर्यंत असेल आणि अनसिक्युअर्ड एनसीडी पोर्शन Rs.50 कोटीपर्यंत असेल

14 व्या एनसीडी इश्युला IND BBB : आउटलुक स्टेबल असे इंडिया रेटिंग्स आणि रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडकडून मानांकन मिळाले आहे.

14 व्या एनसीडी इश्युमध्ये सिक्युअर्ड एनसीडींचे रिडम्प्शन केले असता वार्षिक मोबदला 10.22% पर्यंत मिळू शकेल आणि अनसिक्युअर्ड एनसीडींसाठी हाच मोबदला 10.41%पर्यंत असू शकेल.

14 वा एनसीडी इश्यु 30 मार्च 2021 रोजी खुला होईल आणि 23 एप्रिल 2021 रोजी बंद होईल (हा इश्यु लवकर बंद करण्याचा पर्याय उपलब्ध आहे). 

एनसीडी बीएसई लिमिटेडमध्ये सूचिबद्ध होण्याचे प्रस्तावित आहे.

# अधिक माहितीसाठी 25 मार्च, 2021 या तारखेच्या माहितीपत्रकाचा संदर्भ घ्या.

कोची, 30 मार्च, 2021 : मुथूट्टु मिनि फायनान्सर्स लि.ची (“मुथूट्टु मिनि”/‘एमएमएफएल’) स्थापना 1998 साली झाली. ही कंपनी सुवर्ण कर्ज क्षेत्रामध्ये डिपॉझिट न घेणारी सिस्टेमिकली इम्पॉर्टंट एनबीएफसी आहे. या कंपनीतर्फे त्यांचे सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड डिबेंचर्स (“एनसीडी”) खुले करण्याची घोषणा केली. प्रत्येक डिबेंचरचे दर्शनी मूल्य Rs. 1,000 असेल.

14 व्या NCD इश्युचे एकूण मूल्य Rs. 125 कोटी इतके आहे. यात Rs.125 कोटींपर्यंतचे ओव्हर-सबस्क्रिप्शन करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसे झाल्यास त्याचे एकूण मूल्य Rs.250 कोटी असेल. 14 व्या एनसीडी इश्युमध्ये एनसीडींच्या सबस्क्रिप्शनसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात कूपनचे दर वार्षिक 9.00% - 10.25% आहेत. 14वा इश्यु 30 मार्च 2021 रोजी खुला होईल आणि 23 एप्रिल 2021 रोजी बंद होईल. हा कालावधी लवकर बंद होण्याचा किंवा याचे विस्तारीकरण होण्याचा पर्याय आहे.

30 सप्टेंबर 2020 रोजी एमएमएफएलकडे 3,69,019 सुवर्ण कर्ज खाती होती. यापैकी बुहतांश खाती ग्रामीण आणि निमशहरी भागांतून होती. त्यांचे एकूण मूल्य 1825.55 कोटी होते. त्यांच्यातर्फे देण्यात आलेल्या एकूण कर्जापैकी आणि ॲडव्हान्सेसपैकी हा वाटा एकूण 97.27% आहे. 30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेल्या सहामाहीसाठी त्यांचे निव्वळ नॉन-परफॉर्मिंग असेट्स 0.59% होते, मार्च 2020 मध्ये निव्वळ नॉन-परफॉर्मिंग असेट्स 1.34 % होते.

निनन मथाई मुथुट्टू यांनी 1887 साली या कौटुंबिक व्यवसायाची स्थापना केली. आता या कंपनीचे नेतृत्व अध्यक्ष व पूर्ण वेळ संचालक निझी मॅथ्यू आणि व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मुथुट्टू यांच्या हाती आहे.

एनसीडीच्या प्रत्येक पर्यायाच्या अटी खाली जारी केल्या आहेत :

या इश्युमधून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग ऑनलवर्ड लेंडिंग, फायनान्सिंग आणि कंपनीने घेतलेल्या कर्जाच्या मुद्दलीची व व्याजाची परतफेड/प्रिपेमेंट (किमान 75%) आणि उरलेल्या निधीचा वापर (25%पर्यंत) सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करण्यात येईल.

25 मार्च 2021 या तारखेच्या माहितीपत्रकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड एनसीडी बीएसईमध्ये सूचिबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

विवरो फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्युसाठी लीड मॅनेजर्स आहेत.

व्हिस्ट्रा आयटीसीएल (इंडिया) लिमिटेड हे डिबेंचर ट्रस्टी आहेत आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्युसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत.

मुथूट्टु मिनि फायनान्शिअर्स लिमिटेड : (आरबीआय नोंदणी क्रमांक : N-16.00175)

मुथूट्टु मिनि फायनान्शिअर्स लिमिटेड ही आरबीआयमध्ये नोंदणी असलेली डिपॉझिट न घेणारी सुवर्ण कर्ज क्षेत्रातील सिस्टेमिकली इम्पॉर्टंट एनबीएफसी आहे. त्यांच्यातर्फे गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून घरगुती सोन्याच्या दागिने तारण ठेवून कर्ज देण्यात येत आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि गोवा आणि पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशात या कंपनीच्या 804 शाखांचे नेटवर्क आहे आणि त्यांच्या व्यवसाय संचलनामध्ये एकूण 3,205 कर्मचारी काम करतात.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight