लक्स इंडस्ट्रीज लिमिटेड

लक्स इंडस्ट्रीजच्या ग्रीनफिल्ड विस्तार योजनेसाठी रु. ११० कोटी

मुंबई, २५ मार्च २०२१: लक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (NSE: LUXIND, BSE: BOM: 539542) या भारतातील सर्वात मोठ्या होजिअरी उत्पादक आणि निर्यातदार कंपनीने त्याच्या संचालक मंडळाने ग्रीनफील्ड विस्तार योजनेस ११० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा केली आहे.
कंपनीने आधीच सुमारे ४,६०,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली जागा बांधकामासाठी पाहून ठेवली आहे, त्यामधील २०% ते ३०% हि जागा उत्पादन युनिट आणि गोदाम, साठवण आणि परिष्करण सुविधांसाठी उपयोगात आणली जाईल. पुढील १२-१८ महिन्यांमध्ये कॅपेक्स पूर्ण होईल. लक्स इंडस्ट्रीजकडे कोलकाता, तिरुपूर आणि लुधियाना या तीन प्रमुख सुविधा आहेत ज्या सुधारित कार्यक्षमता आणि लवचिक उत्पादन क्षमतांमुळे स्थापित क्षमतेपेक्षा जास्त वस्त्रे तयार करण्यास सक्षम आहेत. तसेच वर्धित यांत्रिकी साधनांसह आणि बाजारातील मागणीनुसार कार्य करण्याच्या वैज्ञानिक पद्धतीसह क्षमतेच्या दृष्टीने अधिक लवचिकता आणण्याच्या दिशेने कार्य करीत आहे.
सध्या लक्स इंडस्ट्रीज पूर्ण उत्पादन क्षमतेने कार्यरत आहे परंतु उत्पादन क्षमता वाढविण्याकरिता कंपनीकडे तृतीय पक्ष दीर्घकालीन करारही आहे आणि म्हणूनच पुरवठा साखळीसाठी भांडवल गुंतविण्याची कंपनीची योजना आहे तसेच स्वतःच्या वाढीव उत्पादन क्षमतेचेही पाठबळ असणार आहे. लक्स इंडस्ट्रीज आपल्या भांडवलाच्या खर्चाची तरतूद अंतर्गत साधनांतून करते आणि त्यांना कोणत्याची बाह्य वित्त साहाय्याची गरज नाही. कंपनीचा नफा त्यांच्या भांडवलाच्या खर्चाची काळजी घेतो. या गुंतवणूकीने लक्स इंडस्ट्रीजला सुमारे ४०० कोटीने विक्रीत वाढ होईल अशी अपेक्षा आहे.
अध्यक्ष श्री अशोक कुमार तोडी या विस्ताराबद्दल टिप्पणी देताना ते म्हणाले, "कोविड-१९ च्या संकटातही आमची कामगिरी चांगली झाली आणि आम्हाला मागणीतही भरघोस वाढ दिसत आहे. उत्तरोत्तर वाढत असलेल्या या प्रक्षेपवक्राला पाठबळ देण्यासाठी आम्ही ग्रीनफिल्ड विस्तारामध्ये रु. ११० कोटी गुंतवून पुढील १२-१८ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे ठरविले आहे. आमच्या लवचिक मॅन्युफॅक्चरिंग पध्दतीने आम्हाला जोरदार मागणीच्या अंदाजास प्रतिसाद देण्यास अधिक वेगवान केले आहे. नवीन गुंतवणूकीमुळे विद्यमान विभाग तसेच मुलांचे व स्त्रियांच्या कपड्यांसारखे नवीन विभागातील वेगाने कार्य करण्याची आणि बाजारातील भागीदारीत सुधारणा करण्याची आमची क्षमता आणखी वाढेल."
या विषयी बोलताना व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रदीप तोडी म्हणाले, "रु. ११० कोटींच्या या नवीन कॅपेक्समुळे मालमत्तेची उलाढाल चार पटीने वाढून सुमारे रु. ४०० कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल. लवचिक मॅन्युफॅक्चरिंग पध्दतीमुळे आमचे ऑपरेटिंग तसेच रिटर्न मॅट्रिक्स सुधारण्यास मदत झाली आहे आणि नवीन कॅपेक्स ते आणखी मजबूत करेल. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आमच्याकडे रु. १४० कोटी जमा होते जे या कॅपेक्ससाठी संपूर्ण भांडवल पुरविण्यासाठी पुरेसे आहेत. आमच्या मजबूत ऑपरेटिंग रोख प्रवाहाद्वारे समर्थित कॅपेक्स पूर्ण केल्यावर आमची नेट कॅश स्थिती सकारात्मक राखून कामकाजाचे भांडवल आणखी कमी करण्यावर भर देण्याची आमची अपेक्षा आहे."

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight