ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या सेटवर 'होळी पावरी हो रही है'

झी युवा वरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेने प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे नुकताच ४०० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेतील प्रमुख पात्र सई, नचिकेत आणि अप्पा यांच्यावर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. नुकतंच मालिकेत नचिकेतची आई म्हणजेच अभिनेत्री प्रिया मराठेची एंट्री झाली आणि मालिकेने वेगळच वळण घेतलं.
सध्या या मालिकेत होळीचा प्रसंग नुकताच शूट करण्यात आला. यात केतकर आणि देशपांडे हे दोन्ही कुटुंबीय रंगांची उधळण करताना दिसणार आहेत. रंगात न्हाऊन निघालेले दोन्ही कुटुंबीय ओळखण्यात सुद्धा येत नाही आहेत. सगळे अगदी जोशात हा सण साजरा करत आहेत. नुकताच अभिनेत्री प्रिया मराठेने तिचा बिफोर अँड आफ्टर फोटोसुद्धा शेअर केला होता. सध्या सोशल मीडियावर चालत असलेल्या पावरी हो रही है या ट्रेंड नुसार या कलाकारांनी देखील एक धमाल व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. "ये हम है, ये हमारी टीम है और ये हमारी होली चल रही है" असं म्हणत एकच जल्लोष सर्व कलाकारांनी या व्हिडीओ मध्ये केला आहे. त्यांची हि धमाल पाहून चाहते सुद्धा होळीचा प्रसंग मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ