'झी टॉकीज मनोरंजन लीग'मध्ये मनोरंजनाच्या चौकार षटकारांची आतिषबाजी

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी झी टॉकीज हि नेहमीच आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तत्पर असते. सदाबहार चित्रपट, खास कार्यक्रम सादर करून या वाहिनीने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं आहे आणि यापुढेही करत राहील. या एप्रिल महिन्यात झी टॉकीजवर होणार आहे मनोरंजनाच्या चौकार षटकारांची आतिषबाजी कारण झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे 'झी टॉकीज मनोरंजन लीग'.
या लीगमध्ये एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी संपूर्ण दिवस ब्लॉकबस्टर चित्रपट प्रसारित केले जाणार आहेत आणि इतकच नव्हे तर प्रत्येक रविवारी भक्तिपर, कॉमेडी, ऍक्शन आणि ड्रामा या शैलीच्या चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घ्यायला मिळेल. ४ एप्रिल रोजी अष्टविनायक, जय मल्हार, नवरा माझा नवसाचा, देऊळ बंद, हुप्प हुय्या हे भक्तिपर चित्रपट तर त्याच्या पुढील रविवारी ११ एप्रिल रोजी हमाल दे धमाल, पळवा पळवी, मला घेऊन चला, अशी हि बनवा बनवी, गाढवाचं लग्न हे कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या घरी हास्यस्फोट घडवून आणण्यासाठी सज्ज होणार आहेत. १८ एप्रिल हा दिवस मिस्टर अँड मिसेस सदाचारी, धडाकेबाज, लयभारी, मुळशी पॅटर्न, माझा छकुला या ऍक्शनपॅक्ड चित्रपटांनी भरलेला असणार आहे. तसेच २५ एप्रिल रोजी पिंजरा, नटसम्राट, माहेरची साडी, बिन कामाचा नवरा, सैराट या चित्रपटातून प्रेक्षकांना खूप सारा ड्रामा अनुभवायला मिळेल.
तेव्हा मनोरंजनाच्या चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायण्यासाठी बघायला विसरून नका 'झी टॉकीज मनोरंजन लीग' एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी फक्त आपल्या झी टॉकीजवर    

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight