टी- सीरिज आयपीआरएसमध्ये सहभागी - भारतीय संगीत प्रकाशन क्षेत्राला मोठी चालना

 

भारत३१ मार्च २०२१ : टी-सीरिज आणि  इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटी लिमिटेड (IPRS) यांच्या संयुक्त प्रसिद्धी पत्रकात जाहीर करण्यात आले कीसुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजेच टी-सीरिज म्हणून लोकप्रिय असलेल्या कंपनीने आयपीआरएसचे सदस्यत्व घेतले आहे.

 

टी-सीरिज हे भारतातील आघाडीचे म्युझिक लेबल आणि भारताचा सर्वात मोठा चित्रपट निर्मिती स्टुडियो आहेश्रीभूषण कुमार हे या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असून त्यांनी आयपीआरएसमध्ये २००,०००हून अधिक शीर्षकांची लायब्ररी आणली आहेया शीर्षकांममध्ये ५०,००० हून अधिक म्युझिक व्हिडियो आहेतज्यात १५,००० हून अधिक तासांचे संगीत समाविष्ट आहेयात हिंदीपंजाबीभोजपुरीहरयाणवीबंगालीगुजरातीमराठीराजस्थानीतमिळतेलुगूकन्नडमल्ल्याळमओरिया इत्यादी पंधरा भारतीय भाषांमधील संगीत रचनाआणि गीते गाण्यांच्या/म्युझिक व्हिडियोंच्या माध्यमातून समाविष्ट आहेत.

 

टी सीरिजन सहभागी होणे म्हणजे भारतीय संगीत क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण आहे आणि त्यामुळे संगीत रचनाकारगीतकार आणि मालकप्रकाशक यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नोंदणीकृत इंडियन कॉपीराइट सोसायटी असलेल्या आयपीआरएसमध्ये अमूलाग्र सकारात्मक बदल घडून येणार आहेटी-सीरिज सदस्य झाल्यामुळे आयपीआएरएसचे लेखक आणि संगीत रचनाकार असलेल्या सदस्यांना खूप फायदा होणार आहेआयपीआरएस आता टी-सीरिजच्या गीते  संगीत रचनांच्या म्युझिक पब्लिशिंग कॅटलॉगचे प्रतिनिधीत्व करेल आणि विविध प्रकारच्या प्लॅटफॉर्म आणि व्यवसायांना परवाना देईल जे भारतीय संगीताचा मोठ्या प्रमाणावर वापर करतातत्यामुळे भारतातील म्युझिक पब्लिशिंग इकोसिस्टिममध्ये वृद्धी होईल आणि विविध म्युझिक लायसन्सी म्हणजे प्रक्षेपकडिजिटल सेवाटेलिकम्युनिकेशन कंपन्या आणि इतर असे अनेक छोटे व्यवसायांसाठी उद्यमसुलभतेत सुधारणा होईलपरिणामी अशा कंपन्यांना ध्वनिमुद्रण किंवा म्युझिक व्हिडियोमधील कामासाठी सुरळीत एकल खिडकी क्लिअरन्ससाठी म्युझिकचा परवाना घ्यायचा आहेत्यांच्यासाठी हे काम सुलभ होणार आहे.

 

आयपीआरएसचे अध्यक्ष प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर म्हणाले, “मी याला टी-सीरिजची घरवापसी मानतो आणि आपल्या कॉपीराइट कॅटलॉगसाठी आयपीआरएसवर विश्वास टेवल्याबद्दल मी भूषण कुमार आणि टी सीरिज कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतोयामुळे टी सीरिज आणि आमचे लेखक आणि संगीत रचनाकार सदस्य या दोघांचाही लाभ होणार आहेसंपूर्ण संगीत क्षेत्र आज एक झाले आहे आणि रचनाकारसंगीत व्यवसाय हे सर्व एकाच हेतूने एकत्रितपणे काम करणार आहेतआयपीआरएसमधील माझ्यासारख्या इतर संचालकांचेही असेच मत आहे आणि आयपीआरएसच्या संचालक मंडळात स्वागत करण्यास उत्सुक आहे.”

 

टी-सीरिजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीभूषण कुमार म्हणाले, “टी-सीरिज जी निर्मिती करतेत्याचा कॉपीराइट हा गाभा आहेआम्ही आयपीआरएसमध्ये सहभागी होणे  कंपनीच सहाजिक पुढचे पाऊल आहेआम्ही संपूर्ण संगीत क्षेत्राच्या हितासाठी हा निर्णय घेतला - आज संपूर्ण क्षेत्रक्रिएटर्ससंगीत व्यवसायसर्व एकत्र आहेत आणि ते सर्व भागधारकांच्या एकीचे प्रतिनिधीत्व करतात जे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान देत आहेत आणि आपल्या समान हितासाठी एकत्रितपणे काम करत आहेतटी सीरिज आयपीआरएस आणि त्याच्या सदस्यांसाठी अधिक मूल्य घेऊन येईलआमच्या समर्थनाने भविष्यात आयपीआरएसची व्याप्ती अधिक वाढेलजेणेकरून क्रिएटर्सचा समुदाय आणि क्षेत्राला अधिक लाभ होऊ शकेल.”

 

भारत  दक्षिण आशियातील युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्रीदेवराज सान्याल म्हणाले, “भारतातील संगीत क्षेत्रातील पब्लिशिंग बिझनेसमध्ये परिणामकारकपणे बदल घडण्यासाठी ओनर पब्लिशर्स आणि आपल्या आदरणीय संगीतरचनाकारांसाठी न्यायपारदर्शक  योग्य मोबदला मिळावा यासाठी सर्व महत्त्वाच्या संबंधितांनी एकत्र येणे गरजेचे आहे आणि आता आयपीआरएसमध्ये माझे मित्र भूषण कुमार यांची त्यांची टीम सहभागी झाल्यामुळे तो दिवस आला आहेजावेद साहेबभूषण आणि मंडळातील इतर सर्व सदस्य यांच्यासह क्रिएटर्स आणि कॉपीराइट ओनर्स यांच्यासाठी सुवर्ण काळ येईल याची मला खात्री आहे.

 

आयपीआरएसचे सीईओ श्रीराकेश निगम म्हणाले, “टी सीरिज आयपीआरएसमध्ये सहभागी होत असल्याने मी खूप आनंदी झालो आहेयामुळे आयपीआरएसचे लेखक आणि म्युझिक कंपोझर्सचा खूप फायदा होणार आहेटी सीरिज हे म्युझिक आणि चित्रपट क्षेत्रात मार्केट लीडर आहेतचत्याचप्रमाणे नवोदितांना संधी देणारी एक अत्यंत यशस्वी प्रयोगशाला आहे आणि त्यांनी अनेक तरूण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आणि त्यांनी आयपीआरएसशी सहयोग केल्याने त्या सर्वांचा लाभ होणार आहे

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight