पीठ मळताना झाली फजिती - गौतमी देशपांडे
झी मराठीवरील किचन कल्लाकार या लोकप्रिय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. या कार्यक्रमाच्या आगामी भागात गौतमी देशपांडे, गायत्री दातार आणि शिवानी बावकर या तीन सुंदर अभिनेत्री सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात उत्तम पदार्थ बनवून महाराजांना खुश कोण करणार ते प्रेक्षकांना लवकरच कळेल पण या भागात प्रेक्षकांना कलाकारांनी पदार्थ बनवताना झालेल्या फजितीचे मजेदार किस्से देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
गौतमी देशपांडे तिची झालेली फजिती सांगताना म्हणाली, "एकदा पीठ मळताना ते हातातून गेलेलं इतकं पातळ झालं. मी खूप प्रयत्न केले पण ते काही नीट झालं नाही. मग मी रडत रडत आईला फोन केला कि हे नीट नाही होतं आहे, त्यावर आईने त्यात अजून पीठ टाकायला सांगितलं. मग मी पीठ टाकलं मग परत पाणी टाकलं आणि हा सिलसिला चालूच राहिला." त्यावर संकर्षण मिश्कीलपणे 'हा डेलीसोप केल्याचा परिणाम आहे' असं म्हणाला. गायत्री आणि शिवानीने देखील त्याची झालेल्या फजितीचे मजेदार किस्से शेअर केले. त्यामुळे पाहायला विसरू नका मस्त मजेदार किचन कल्लाकार गुरुवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर
Comments
Post a Comment