टीव्हीएस युरोग्रिपच्या “ब्रन्च ॲन्ड बायकिंगच्या” चौथ्या उपक्रमास उत्स्फ़ूर्त प्रतिसाद
टीव्हीएस युरोग्रिपच्या “ब्रन्च ॲन्ड बायकिंगच्या” चौथ्या उपक्रमास उत्स्फ़ूर्त प्रतिसाद
या उपक्रमामुळे सुरक्षिततेबद्दल जागृकता निर्माण झाली
पुणे, 17 ऑक्टोबर, 2022: भारतातील दोन आणि तीन चाकी वाहनांमध्ये अग्रगण्य असलेल्या टीव्हीएस युरोग्रिपच्या ब्रन्च ॲन्ड बायकिंगच्या चौथ्या उपक्रमास, आज 16 ऑक्टोबर , 2022 रोजी पुण्यामध्ये हिरवा झेंडा दाखविण्यात आला. पुणे आणि नजिकच्या गावांमधून,सुमारे 220 उत्साही चालकांनी यात सहभाग घेतला असून भुगाव ते लवासा असा दिड तासांचा पल्ला त्यांनी पार केला.
“ब्रन्च ॲन्ड बायकिंग” हा टीव्हीएस युरोग्रिपचा एक महत्वाचा प्रवास उपक्रम असून, यामुळे दुचाकी वाहन चालकांना एकत्र येऊन गाडी चालवत – “ रस्ते संरक्षण” या सामाजिक कार्याप्रती जागरूकता निर्माण करण्याची एक संधी उपलब्ध होते.
विविध रायडिंग क्लबचे बाईकर्स, व्यावसायिक आणि विविध वयोगटातील लोकांनी या 44 किलोमीटर प्रवास उपक्रमात भाग घेतला, ज्याची सुरवात ही रॉयल लेक्स बॅन्क्वेट्स ॲन्ड रिसॉर्ट्स, भुगाव येथून झाली आणि चालकांनी गाड्या चालवत नयनरम्य अशा मार्गातून लवासा पर्यंतचा पल्ला गाठला.
यावेळेला बोलताना, टीव्हीएस श्रीचक्र लिमिटेडचे ईव्हीपी, विक्री आणि विपणन अधिकारी श्री. पी. माधवन म्हणाले, “ 3 यशस्वी उपक्रमांनंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये ब्रन्च ॲन्ड बायकिंग करताना आम्हाला अतीशय आनंद झाला. मागील कार्यक्रमांमध्ये आम्ही बाईक चालविणाऱ्यांना आनंद मिळावा आणि धाडसी असा अनुभव मिळावा म्हणून हे उपक्रम राबविले होते. याच उत्साहपूर्ण वातावरणासह प्रत्येकवेळी बाईक चालक आम्हाला प्रतिसाद देतील आणि आम्ही देशभरात अशा राईड्सचे आयोजन करत सामाजिक विषयाप्रती जागृकता निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकू अशी आमची आशा आहे.”
राईडर्सच्या सोयी आणि सुरक्षिततेकरता, मोटरबाईक मेकॅनिक, रूग्णवाहिका, ऑन कॉल डॉक्टर आणि सेवा सहाय्यक हे संपूर्ण राईडच्या वेळी उपलब्ध करून देण्यात आले होते. यापुर्वीचे ब्रन्च ॲन्ड बायकिंग उपक्रम हे भुवनेश्वर, बेंगरूलु आणि चेन्नई येथे 2021 नोव्हेंबर, 2022 मार्च आणि 2022 ऑगस्ट रोजी घेण्यात आले होते.
टीव्हीएस युरोग्रिपचा इतर शहरातून देखील अशा प्रकारचे आणखीन उपक्रम राबवत बायकिंगची आवड असलेल्यांना एकत्र आणण्याचा मानस आहे.
Comments
Post a Comment