अंतराच्या साथीने मल्हारचा वनवास होणार सुखकर !

जीव माझा गुंतला सोम ते शनी रात्री ८.३०वा. कलर्स मराठीवर.

मुंबई १७ ऑक्टोबर, २०२२ : जीव माझा गुंतला मालिकेत मल्हार - अंतराच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. शितोळे कुटुंबाला होणारा त्रास मल्हारला बघवत नसल्याने तो अंतराचं घर सोडून वेगळं रहण्याचा निर्णय घेणार आहे आणि त्याला अंतराची साथ मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोघांच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली असून, त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. हा प्रवास मल्हारसाठी जास्त आव्हानत्मक आणि खडतर असणार आहे. "तुला अजूनही हा वनवास भोगावा असं वाटेत आहे का”?- मल्हार.  आजपर्यंत मल्हारला अंतराने प्रत्येक संकटात साथ दिली आहे आणि आता देखील त्याला अंतराची खंबीर साथ मिळणार आहे. अंतराने मल्हार सरांना वचन दिले आहे, “सीतेने भोगला वनवास रघुरामचंद्राच्या साथीने, वचन देते अंतरा राहील कायम मल्हार सरांच्या सोबतीला". वनवासात अंतरा मल्हारला साथ देणार आहे. बघूया त्यांचा हा नवा प्रवास कसा राहील ? त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल ? अंतराच्या साथीने मल्हारचा हा वनवास कसा होणार सुखकर. तेव्हा बघत राहा जीव माझा गुंतला सोम ते शनी रात्री ८.३०वा. कलर्स मराठीवर.


Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable