मिरे अँसेट म्युच्युअल फंडकडून मिरे अँसेट स्माँल कँप फंड बाजारात
मिरे अँसेट म्युच्युअल फंडकडून मिरे अँसेट स्माँल कँप फंड बाजारात
स्माँल कँप समभागांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणारी ओपन ए्ंडेड समभाग योजना
मुंबई, 15जानेवारी 2025: मिरे अँसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रा. लि.ने प्रामुख्याने स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणऱ्या मिरे अँसेट स्मॉल कॅप फंड या ओपन एंडेड समभाग योजनेची घोषणा केली आहे. या फंडचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांना संशोधनावर आधारित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक दृष्टीकोनाद्वारे प्रामुख्याने शक्तिशाली स्मॉल कॅप कंपन्यांच्या संभाव्य वाढीत सहभागी होण्याची संधी देण्याचे आहे. हा फंड निफ्टी स्मॉल कॅप २५० टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय)ने बेंचमार्क केला जाईल आणि त्याचे व्यवस्थापन श्री. वरूण गोयल, वरिष्ठ फंड मॅनेजर इक्विटी हे करतील.
मिरे अँसेट स्मॉल कॅप फंड जास्त धोका पत्करू शकणाऱ्या आणि अर्थव्यवस्थेच्या अधिक वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमध्ये सहभागाद्वारे मालमत्ता निर्मिती करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तयार केला आहे. यात तरूण, डायनॅमिक गुंतवणूकदारांचा समावेश आहे, ज्यांना जास्त वाढीच्या संधी घ्यायच्या आहेत, तसेच पोर्टफोलिओचे परतावे वाढवू इच्छिणारे अनुभवी धोका पत्करणारे गुंतवणूकदार आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीद्वारे बाजारातील चढउतारांचे व्यवस्थापन करू इच्छिणारे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) गुंतवणूकदार यांचा समावेश आहे. विविध प्रोफाइल्सना सेवा देऊन ही योजना गुंतवणूकदारांच्या वैविध्यपूर्ण उद्दिष्टांची पूर्तता करू इच्छिते.
मिरे अँसेट स्मॉल कॅप फंडसाठी न्यू फंड ऑफर (एनएफओ) १० जानेवारी २०२५ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुली होईल आणि २४ जानेवारी २०२५ रोजी बंद होईल. ही योजना ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी सलग विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा खुली होईल. या योजनेत न्यू फंड ऑफरदरम्यान किमान प्रारंभीची गुंतवणूक ५००० रूपये (पाच हजार रूपये) असेल आणि त्यानंतरची गुंतवणूक १ रूपयाच्या प्रमाणात असेल.
या फंडच्या अनावरणाबाबत बोलताना मिरे अँसेट मॅनेजर्स (इंडिया) प्रा. लि.चे वरिष्ठ फंड मॅनेजर श्री. वरूण गोयल म्हणाले की, “स्मॉल कॅप गुंतवणूक अशी असते, जिथे माहिती आणि नवीन संधी एकत्र येतात. आमचा नवीन फंड मिरे अँसेटच्या डेटावर आधारित निर्णय प्रक्रिया आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीच्या तत्त्वज्ञानावर काम करतो आणि भारताच्या वाढीच्या कथांमध्ये सातत्यपूर्ण काम करतो.”
या योजनेतून शाश्वत पद्धतीने जास्त उत्पन्न, जास्त भांडवली कार्यक्षमता, चांगले कॉर्पोरेट प्रशासन आणि कमी किंवा नगण्य धोका दर्शवणाऱ्या दर्जेदार समभागांमध्ये गुंतवणूक केली जाईल. त्यातून किमान ६५ टक्के फंड स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवला जाईल तर उर्वरित ३५ टक्के फंड मिडकॅप आणि लार्ज कॅप स्टॉक्समध्ये गुंतवला जाईल.
या अँक्टिव्ह स्मॉल कॅप फंडचे अनावरण करून मिरे अँसेट म्युच्युअल फंडकडून बाजारातील बदलत्या संधींसाठी तयार केलेल्या नावीन्यपूर्ण गुंतवणूक उपाययोजना देण्याप्रति आपली वचनबद्धता स्पष्ट करत आहे. आपल्या उत्तम संशोधन क्षमता, शिस्तबद्ध गुंतवणूक तत्त्वज्ञान आणि जागतिक दर्जाचे ज्ञान यांचा वापर करून हा फंड गुंतवणूकदारांना भारताच्या वैविध्यपूर्ण स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत आहे. भारतासारख्या सातत्याने बदलत्या अर्थव्यवस्थेत वापरात न आलेली आणि योग्य किंमत न लावलेली क्षेत्रे असतात. तिथे वाढीच्या मोठ्या संधी असतात आणि मध्यम ते दीर्घकालीन परिस्थितीत समभागधारकांसाठी मोठे मूल्य निर्माण करतात. आम्ही अशा संधींचा शोध लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
सर्व माहितीचा स्त्रोत: ब्लूमबर्ग, एएमएफआय. माहिती: ३१ डिसेंबर २०२४ नुसार
Comments
Post a Comment