पर्ण बनली रुबीना

 पर्ण बनली रुबीना  

मालिकानाटक चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री पर्ण पेठे आता जिलबी चित्रपटात एका वेगळ्या व्यक्तिरेखेत  दिसणार आहे. पर्णने  आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा जिलबी चित्रपटातील रुबीना ही  मुस्लिम  मुलीची भूमिका खूपच वेगळी आहे. रुबिना अत्यंत कणखर आणि धाडसी मुलगी आहेआनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित जिलबी चित्रपट १७ जानेवारीला आपल्या भेटीला  येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी  केले  आहे.

अभिनेता स्वप्नील जोशीप्रसाद ओकशिवानी सुर्वे गणेश यादवप्रणव रावराणेअश्विनी चावरेप्रियांका भट्टाचार्य या  कलाकारांच्या भूमिका जिलबी चित्रपटात आहेत. या भूमिकेसाठी तिचा लूक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पर्ण सांगते, मी खूप काही ठरवून असं करत नाही. कथेमध्येभूमिकेत काही वेगळेपण असेलतर ते करायला आवडतं’. चांगल्या विषयामुळे मी या चित्रपटाला होकार दिला. माझ्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून जिलबी चित्रपटातील माझ्या या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतीलअसा विश्वास पर्ण व्यक्त करते. इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये सस्पेन्स थ्रीलरपटांची संख्या फार कमी असूनजिलबी हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल, असे पर्ण  सांगते.

जिलबी चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO