संक्रांतीनिमित्त 'गुलकंद’च्या टीमकडून शुभेच्छा
सई, प्रसाद, समीर आणि ईशाची पतंग उडाली!
संक्रांतीनिमित्त 'गुलकंद' च्या टीमकडून शुभेच्छा..
काही दिवसांपूर्वी 'गुलकंद' या बहुचर्चित चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हीच उत्सुकता कायम ठेवत संक्रांतीनिमित्त 'गुलकंद’च्या टीमने प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे मोशन पोस्टर पाहून मात्र प्रेक्षकवर्गात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टरमध्ये सई, समीर, प्रसाद आणि ईशा यांचे पतंग आकाशात उंच भरारी घेताना दिसत असतानाच यात काही गुंतागुंतही दिसत आहे. कधी समीर आणि सईची पतंग एकत्र दिसत आहे तर कधी प्रसाद आणि सईची पतंग उडताना दिसत आहे. मध्येच समीर आणि ईशाची पतंगही भरारी घेताना दिसत आहे. त्यामुळे कोणाची पतंग कुठे चालली आहे, हे बघायला मजा येणार आहे. मात्र यासाठी प्रेक्षकांना १ मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित, सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
Comments
Post a Comment